व्होडाफोन आणि आयडियापेक्षा कमी आहेत रिलायन्स जिओचे अॅक्टिव्ह युजर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 08:07 PM2018-10-01T20:07:58+5:302018-10-01T20:09:33+5:30
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने टेलिकॉम सेक्टरध्ये धमाकेदार इन्ट्री करत रिलायन्स जिओ लाँच केले. मोफत सर्व्हिस, आकर्षक ऑफर आणि 4 जी सर्व्हिस यामुळे कंपनीने कमी वेळेत टेलिकॉम सेक्टरमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे.
नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने टेलिकॉम सेक्टरध्ये धमाकेदार इन्ट्री करत रिलायन्स जिओ लाँच केले. मोफत सर्व्हिस, आकर्षक ऑफर आणि 4 जी सर्व्हिस यामुळे कंपनीने कमी वेळेत टेलिकॉम सेक्टरमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. दरम्यान, युजर्स पाहिले असता रिलायन्स जिओ भारतातील दुसरी मोठी टेलिकॉम कंपनी बनली. मात्र, जुलै महिन्याच्या शेवटी रिलायन्स जिओच्या अॅक्टिव्ह युजर्सच्या संख्येत घट होत चौथ्या स्थानावर पोहोचली आहे.
भारतीय टेलिकॉम रेग्युलेटर TRAI च्या आकडेवारीनुसार, जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत जिओचे अॅक्टिव्ह युजर्स 187.3 मिलियन होते. भारती एअरटेलच्या तुलनेत जिओची ही आकडेवारी कमी आहे. भारती एअरटेलचे अॅक्टिव्ह युजर्स जवळपास 342 मिलियन आहेत. तर, व्होडाफोनचे 206.4 अॅक्टिव्ह युजर्स आहेत. आयडिया सेल्यूलरचे 201.3 मिलियन मंथली युजर्स आहेत. टेलिकॉम अॅनालिस्टच्या म्हणण्यानुसार, हे नंबर्स खऱ्या युजर्सचे असतात आणि लोकप्रियतेला खरा अंदाज लावू शकतात. टेलिकॉम अॅनालिस्टचे महेश उप्पल यांनी सांगितले की, जिओसाठी डेटा कस्टमर्स मिळविणे सोपे आहे. मात्र, कठीण हे आहे की, किती युजर्स जिओला आपला प्राइमरी फोन नंबर ठेवतात.
टक्केवारीत सांगायचं झाल्यास, जिओचे 82.5 टक्के युजर्स अॅक्टिव्ह आहेत. मात्र, भारती एअरटेलच्या एकूण युजर्सपैकी 99.42 टक्के युजर्स अॅक्टिव्ह आहेत. व्होडाफोनचे 92.84 टक्के युजर्स अॅक्टिव्ह आहेत. देशातील 1.16 बिलियन मोबाईल युजर्समध्ये 86.97 टक्के युजर्स अॅक्टिव्ह आहेत.