उरले फक्त 4 आठवडे, गुगलचे डुडल बनवा अन् जिंका लाखोंची बक्षिसे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 12:26 PM2018-09-06T12:26:14+5:302018-09-06T12:32:59+5:30
गुगलने डुडल बनविण्यासाठी एक स्पर्धा सुरू केली असून या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकाला 5 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. विशेष म्हणजे गुगलकडून बक्षिसाचे महापॅकेजच संबंधित विद्यार्थी
मुंबई - गुगलकडून नेहमीच नवनवीन संकल्पना सुरू करण्यात येत असतात. तसेच डुडलच्या माध्यमातून जगभरातील आदर्श वक्ती, संस्था, क्रीडा, राजकारण अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तींना गुगलकडून आदरांजलीही वाहण्यात येते. तसेच विशेष दिवसाचे महत्व ओळखून गुगलकडून डुडल तयार केले जाते. आता, गुगलवर आपण जे डुडल पाहतो, ते डुडल बनविण्याची स्पर्धा गुगलने सुरू केली आहे. त्यामुळे आपल्या कल्पनेला गुगलवरुन व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
गुगलने डुडल बनविण्यासाठी एक स्पर्धा सुरू केली असून या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकाला 5 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. विशेष म्हणजे गुगलकडून बक्षिसाचे महापॅकेजच संबंधित विद्यार्थी आणि त्याच्या शाळेला देण्यात येणार आहे. बक्षिसाच्या या पॅकेजमध्ये 5 लाख रुपये स्कॉलरशीप, शाळेसाठी 2 लाखांचे टेक्नॉलॉजी पॅकेज, गुगल ऑफिस व्हिजीट, गुगल स्वॅग, ट्रॉफी सर्टिफिकेट जिंकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. मात्र, ही स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी असून केवळ इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे विद्यार्थीच या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार आहेत. 6 ऑक्टोबर 2018 च्या रात्री 10 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना आपला अर्ज करता येईल. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आता केवळ 4 आठवडे उरले आहेत. त्यामुळे पालकांनी आणि शिक्षकांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांची क्रिएटीव्ह कला गुगलकडे अर्ज करुन जमा केल्यास हे बक्षीस जिंकण्याची नामी संधी आहे.
गुगलकडे असा करा अर्ज
1 सर्वप्रथम गुगल या सर्च इंजिनवर जा. ( https://www.google.com/)
2 गुगलच्या सर्च बार खाली
‘Calling all young artists: 4 weeks left to submit your artwork for Doodle 4 Google’ अशी एक ओळ दिसत आहे. त्या ओळीवरील ‘submit your artwork‘ येथे क्लिक करा.
3 त्यानंतर Inter A Doodle असा पर्याय दिसतो, या पर्यायावर क्लीक करुन तुम्ही अर्ज भरायला सुरुवात करु शकता.