पासवर्ड असा ठेवा लक्षात, कामात यश देणारे लाइफ स्किल्स
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 10:33 AM2023-01-15T10:33:50+5:302023-01-15T10:38:32+5:30
कोणतेही काम करताना सतत शिकणे, आपल्यात सुधारणा करणे महत्त्वाचे असते.
संकलन : सुमंत अयाचित, मुख्य उपसंपादक
माइंडफुलनेस- एखादा सहकारी आपली कल्पना चारचौघांत शेअर करतो आणि आपल्याला श्रेय देत नाही. त्यावेळी काय कराल? येथे माइंडफुलनेस कामाचा आहे. घडणाऱ्या घटनांवर तत्काळ प्रतिसाद न देता भावनिक प्रतिसाद देण्याची व कोणतीही घटना निष्पक्षपणे पाहण्याची क्षमता.
लवचिकता- धक्के हे जीवनाचा भाग आहेत. तुम्ही त्यांना कसे प्रतिसाद देता ते महत्त्वाचे आहे. अधिक लवचिक होण्यासाठी अधिक अनुभव घ्या. तुमच्या चुकांमधून शिकण्यावर आणि त्यापासून पुढे जाण्यावर लक्ष केंद्रित करा.
सर्वोच्च कामगिरी-दैनंदिन कामांमध्ये सर्वोच्च आणि सर्वोत्तमतेचा समतोल राखणे आवश्यक असते. इतर कामे बाजूला ठेवून प्रमुख कामावर लक्ष केंद्रित करा. लक्ष केंद्रित करण्याचा मार्ग कोणता, हे मात्र प्रत्येकाला शोधावे लागणार आहे.
सहवेदना- जो कोणी सहवेदना दाखवण्याची क्षमता आपल्या सुधारणेसाठी वापरतो तो अधिक आनंदी होतो. सहवेदना म्हणजे स्वत:ला दुसऱ्याच्या जागी ठेवण्याची आणि त्याला कसे वाटेल, हे पाहण्याची क्षमता. जेव्हा तुम्ही मदतीसाठी तयार असता, तेव्हा तुम्ही हवेहवेसे होता.
जिज्ञासूपणा- सतत चौकस राहा. आज व्यवसायात कोणती कौशल्ये लागतात आणि बदल कसे घडताहेत, हे जाणून घ्या. जिज्ञासू लोकांनी जगातील सर्वांत कठीण समस्या सोडवल्या आहेत.