रिमिक्स प्रणालीचा शेवट
By शेखर पाटील | Published: July 28, 2017 06:51 PM2017-07-28T18:51:28+5:302017-07-28T18:51:58+5:30
रिमिक्स ही अँड्रॉइडवर आधारित ऑपरेटींग सिस्टीम बंद करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली असून यामुळे यावर आधारित उपकरणांना भविष्यात सुरक्षाविषयक बाबींना तोंड द्यावे लागेल.
रिमिक्स ही अँड्रॉइडवर आधारित ऑपरेटींग सिस्टीम बंद करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली असून यामुळे यावर आधारित उपकरणांना भविष्यात सुरक्षाविषयक बाबींना तोंड द्यावे लागेल.
जिडे टेक्नॉलॉजी या कंपनीने रिमिक्स ऑपरेटींग सिस्टीमला विकसित केले होते. ही सिस्टीम अँड्रॉइडपासून विकसित करण्यात आली असली तरी यात विंडोजप्रमाणे टास्क बार देण्यात आला आहे. यावरून विविध सॉफ्टवेअर्सला सहजगत्या कार्यरत करता येते. या प्रणालीत मल्टी-टास्कींगची प्रक्रिया सुलभ पध्दतीने होत असल्याचा दावा करण्यात आला होता. याची खासियत म्हणजे यात गुगल प्ले स्टोअर देण्यात आले असून याच्या मदतीने कुणीही अँड्रॉइड अॅपचा वापर करू शकतो. ही सिस्टीम खास करून संगणक आणि लॅपटॉपसाठी वापरली जात होती. अर्थात रिमिक्स प्रणालीवर चालणार्या या उपकरणांवर स्मार्टफोन अथवा टॅबलेटप्रमाणे अँड्रॉइड अॅप वापरण्याची सुविधा मिळत असल्याचे यापासून मोठ्या प्रमाणात अपेक्षा होत्या. मात्र याची पूर्तता झाली नाही. काही कंपन्यांनी यावर आधारित उपकरणे बाजारपेठेत उतारली तरी त्याला फारसा प्रतिसाद लाभला नाही. यामुळे जिडे टेक्नॉलॉजीने ही प्रणाली बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात आगामी काळात रिमीक्ससाठी कोणतेही सिक्युरिटी अपडेटदेखील12 मिळणार नाहीत. यामुळे या ऑपरेटींग सिस्टीमवर आधारित उपकरणे घेणार्यांची गोची होणार आहे.
तर दुसरीकडे जिडे टेक्नॉलॉजीने आपले लक्ष पूर्णपणे कार्पोरेट ग्राहकांवर केंद्रीत करणार असल्याचे जाहीर केले आहे. या संदर्भात संबंधीत कंपनीतर्फे जारी करण्यात आलेल्या निवेदनात विवरण देण्यात आले आहे. (hyperlink :- http://www.jide.com) यानुसार रिमिक्स प्रणालीसोबत रिमिक्स आयओ आणि रिमिक्स आयओ प्लस (hyperlink:- https://www.kickstarter.com/projects/jidetech/remix-io-a-4k-nougat-powered-all-in-one-device) ही दोन उपकरणेदेखील मागे घेण्यात आली असून ‘किकस्टार्टर’च्या माध्यमातून याला खरेदी करणार्यांना त्यांचे पैसे परत दिले जाणार असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. एकीकडे गुगलने क्रोमबुकच्या माध्यमातून अँड्रॉइडची व्याप्ती वाढविण्याचा प्रयत्न सुरू केला असून यासोबत अॅपलेनेही आयपॅडला डेस्कटॉपचा पर्याय म्हणून सक्षम करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमिवर रिमिक्स ऑपरेटींग प्रणालीने घेतलेला निरोप हा अनाकलनीय वाटत आहे.