सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या 'या' अॅप्सबद्दल तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या रिसर्च..
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 12:13 PM2019-12-29T12:13:29+5:302019-12-29T12:22:48+5:30
सध्याच्या काळात लोकांना जगातल्या कोणत्याही नात्यापेक्षा स्वतःचा मोबाईल महत्वाचा असतो.
(Image credit- voicendata.com)
सध्याच्या काळात लोकांना जगातल्या कोणत्याही नात्यापेक्षा स्वतःचा मोबाईल महत्वाचा असतो. कोणत्याही ठिकाणी असतील तरी लोकं मोबाईलवर सगळ्यात जास्त वेळ घालवत असतात. याच विषयाशी निगडीत एक रिसर्च रिर्पोट समोर आला आहे. या रिर्पोटनुसार भारतातील मोबाईलचे वापरकर्ते मोबाईल वापरण्यासाठी वर्षाचे ७५ तास वापरत असतात. तसंच भारताताल लोकांचा रोजचा वापर ५ ते 6 तासांचा असतो इतका वेळ सोशल मिडीयावर एक्टीव्ह असतात.
मागील काही वर्षात असे काही अॅप्स लॉन्च झाले आहेत. ज्या अॅप्सनी लोकांच्या आयुष्यात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. तसंच अनेक अॅप्स असे सुद्धा आहेत ज्यांचा वापर करून युजर्स पैसे कमावत आहेत. तसंच आपलं करीअर म्हणून त्यांनी सोशल मिडीया निवडले असून आता युजर्स कन्टेंट निर्माण करत आहे. त्यामुळे माध्यामांचा वापर तुफान केला जातो. चला तर मग जाणून घेऊया या अॅप्लिकेशन्सबद्दल.
इंन्स्टाग्राम
इंन्स्टाग्राम या अॅप्लिकेशनचा वापर भारतातील लाखो लोक करतात. हे अॅप २०१० मध्ये लॉंन्च करण्यात आलं. दोन वर्षांनंतर फेसबूकने विकत घेतले. या रिर्पोटनुसार दररोज ५० करोड युजर्स रोज या अॅपवर आपले फोटो, व्हिडीओ आणि शॉर्ट फिल्मस पोस्ट करत असतात.
व्हाट्सअॅप
२००९ मध्ये व्हाट्सअॅप सोशल मिडियावर प्रचलीत झाले. तसंच २०१० मध्ये या अॅपला लोकप्रियता प्राप्त झाली. आणि हे सुरुवातीला फक्त चॅटींगपूरता मर्यादित होतं. परंतू नंतर वेगवेगळे फिचर्स अॅड होत गेले. आजकाल व्हाट्सअॅप स्टेटस आणि त्यातल्या इतर फिचर्सचा वापर करून लोकांना कमाईचे साधन उपलब्ध झाले आहे.
फेसबूक मॅसेंजर
फेसबूकचा वापर करून सध्याच्या काळात अनेक गोष्टी केल्या जातात. २०११ मध्ये फेसबूक नवीन फिचर्ससह प्रचलीत झाले. यात अनेकांनी आपले कलागुण दाखवत व्हिडीओज पोस्ट करून त्याआधारे प्रसिद्धी मिळवली आणि स्वतःचा प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. तसंच सगळ्यात जास्त व्हिडीओज आणि पोस्ट फेसबूकला पाहिल्या जातात.
टिकटॉक
२०१७ मध्ये बाईट डान्स याने हे अॅप लॉंन्च केले. कमी वेळात या अॅपला जवळपास ५० करोडपेक्षा जास्त युजर्स मिळाले. या माध्यामातून अनेक अॅक्टींगप्रमींनी आपल्या आवडत्या संगीताचा आणि डायलॉग्सचा पाऊस पाडला. सध्याच्या घडीला टिकटॉकचा वापर मनोरंजनाचं माध्यम म्हणून करत असलेल्यांची संख्या तर जास्त आहेच पण या माध्यामातून कमाई करणारे लोक सुद्दा भरपूर मोठ्या प्रमाणावर आहेत.