Qualcomm च्या चिपसेटमध्ये मोठी गडबड; हॅकर कोणाचेही कॉल ऐकू शकतात!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 12:42 PM2021-05-09T12:42:46+5:302021-05-09T12:44:24+5:30

आता Qualcomm चे प्रोसेसर वापरणाऱ्या स्मार्टफोन्स युझर्सना सतर्क राहण्याची सूचना करण्यात आल्या आहेत.

report says qualcomm chip bug affects around 30 percent of phones globally hackers can also hear calls | Qualcomm च्या चिपसेटमध्ये मोठी गडबड; हॅकर कोणाचेही कॉल ऐकू शकतात!

Qualcomm च्या चिपसेटमध्ये मोठी गडबड; हॅकर कोणाचेही कॉल ऐकू शकतात!

Next
ठळक मुद्देQualcomm च्या चिपसेटमध्ये मोठी गडबडहॅकर कोणाचेही कॉल ऐकू शकतात!जगभरातील 30 टक्के फोन धोक्यात

नवी दिल्ली:मोबाइलचेतंत्रज्ञान दिवसेंदिवस आणखीन प्रगत आणि अद्यायावत होत चालले आहेत. मात्र, या तंत्रज्ञानातील काही चुकांचा फायदा हॅकर्सकडून घेतला जातो. याचा मोठा फटका युझर्सना बसताना दिसतो. आता Qualcomm चे प्रोसेसर वापरणाऱ्या स्मार्टफोन्स युझर्सना सतर्क राहण्याची सूचना करण्यात आल्या आहेत. कारण या प्रोसेसरमध्ये एक बग म्हणजेच कमतरता असल्याचा दावा चेकपॉइंड या कंपनीकडून करण्यात आला असून, यामुळे जगभरातील ३० टक्के स्मार्टफोन्स युझर्स धोक्यात आले आहेत. यामुळे जगभरातील हॅकर्स कोणाचेही बोलणे ऐकू शकतात, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. (report says qualcomm chip bug affects around 30 percent of phones globally hackers can also hear calls)

चेकपॉइंट या रिसर्च कंपनीकडून एक रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. त्यानुसार, Qualcomm या प्रोसेसरच्या चिपसेटमध्ये बग आढळून आला असून, याचा फटका जगभरातील ३० टक्के स्मार्टफोन्स युझर्सना बसत असून, हॅकर्स कोणाचेही फोन कॉल ऐकू शकतात, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. एवढेच नव्हे तर हॅकर्स स्मार्टफोनमधील टेक्स्ट मॅसेज म्हणजेच संदेशही मिळवू शकतात, असेही रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. 

किमतीत आयफोनलाही टाकले मागे; Sony च्या 'या' फोनसाठी मोजावे लागणार २ लाख रुपये

कोणत्या कंपनीचे स्मार्टफोन प्रभावित

Qualcomm च्या चिपसेटमध्ये बग असलेला प्रोसेसर सॅमसंग, गुगल, शाओमी, एलजी यांसह जवळपास सर्वच कंपनीच्या स्मार्टफोनमध्ये लावण्यात आला आहे, असे चेकपॉइंटने म्हटले आहे. तसेच संशोधकांचे म्हणणे आहे की, ही सदोष चिप सध्या जगभरात ४० टक्के स्मार्टफोनमध्ये वापरली गेली आहे. मात्र, यातील ३० टक्के स्मार्टफोन्स जे क्वालकॉम एमएसएम इंटरफेसने (क्यूएमआय)  युक्त आहेत, तेच हॅकर्सच्या रडावर आले आहेत. या सदोष चिपमुळे स्मार्टफोनमधील डेटा हॅकर्स मिळवू शकतात, असा दावा केला गेला आहे. 

Aadhar Card सुरक्षित कसे करावे? ‘या’ सोप्या पद्धतीने करा घरबसल्या लॉक

मलेशियन ट्रोजनचा वापर 

रिपोर्टनुसार, हॅकर्सकडून मलेशियन ट्रोजन अॅपचा वापर करण्यात येत असून, या माध्यमातून त्यांना युझर्सचा डेटा मिळवणे शक्य होते. एकदा स्मार्टफोनमध्ये प्रवेश मिळाला की, संवेदनशील माहिती चोरून त्याचे रुपांतर मलेशियन कोडमध्ये केले जात आहे, असे नमूद करण्यात आले आहे. एकदा फोन हॅक करण्यात यश आले की, पीडिय युझर्सची फोन लिस्ट, मेसेजेस आणि युझरने कॉल संभाषणही हॅकर्स ऐकू शकतात, असे सांगितले जात आहे. 
 

Web Title: report says qualcomm chip bug affects around 30 percent of phones globally hackers can also hear calls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.