उद्या ही वेळ लक्षात ठेवा, अन् नंबर लावा! २६ रुपयांना मिळणार स्मार्ट वॉच आणि इअरबड्स; ४००० रुपयांच्या वस्तू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 21:16 IST2025-01-25T21:15:53+5:302025-01-25T21:16:06+5:30

Republic Day Sale: फ्लिपकार्ट, अमेझॉनसारख्या ई-कॉमर्स कंपन्या मोठमोठ्या ऑफर्स देऊन त्यांच्याकडे असलेल्या उत्पादनांची विक्री करणार आहेत. आपल्या शहरातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची दालने देखील ऑफर्स ठेवणार आहेत.

Republic Day Sale: Remember this time tomorrow, and put in the number! Lava Smart watch and earbuds will be available for Rs 26; items worth Rs 4000... | उद्या ही वेळ लक्षात ठेवा, अन् नंबर लावा! २६ रुपयांना मिळणार स्मार्ट वॉच आणि इअरबड्स; ४००० रुपयांच्या वस्तू...

उद्या ही वेळ लक्षात ठेवा, अन् नंबर लावा! २६ रुपयांना मिळणार स्मार्ट वॉच आणि इअरबड्स; ४००० रुपयांच्या वस्तू...

उद्या प्रजासत्ताक दिन आहे. फ्लिपकार्ट, अमेझॉनसारख्या ई-कॉमर्स कंपन्या मोठमोठ्या ऑफर्स देऊन त्यांच्याकडे असलेल्या उत्पादनांची विक्री करणार आहेत. आपल्या शहरातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची दालने देखील ऑफर्स ठेवणार आहेत. कपड्यांवरही ऑफर्स असणार आहेत. अशातच एक भारतीय कंपनी आपली उत्पादने केवळ २६ रुपयांना विकणार आहे. स्मार्ट वॉच आणि इअरबड्स उद्या एका ठराविक वेळेला २६ रुपयांना उपलब्ध होणार आहेत. 

लावा (Lava) ने रिपब्लिक डे सेलची घोषणा केली आहे. यामध्ये स्मार्टफोनसह अन्य उत्पादने ही कमी किंमतीत मिळणार आहेत. अशातच दुपारी १२ वाजता लावा पहिल्या १०० ग्राहकांना ProWatch ZN आणि Probuds T24 हे फक्त २६ रुपयांना विकणार आहे. या वॉचची किंमत 2599 रुपये आणि बड्सची किंमत 1299 रुपये आहे. म्हणजेच लावा ही ४००० रुपयांची उत्पादने ५२ रुपयांना उपलब्ध करणार आहे. 

७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त लावाने या विक्रीची घोषणा केली आहे. या सेलमध्ये ७६ टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. ही विक्री २६ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १२ वाजता सुरू होईल. लावाच्या अधिकृत ई-स्टोअरवरून ही उत्पादने खरेदी करता येणार आहेत. 

फिचर्स काय...
प्रोवॉच झेडएन स्मार्टवॉचमध्ये १.४३ इंचाचा एमोलेड डिस्प्ले आहे. बॅटरी लाइफ ७ दिवसांची असून व्हॅलेरियन ग्रे आणि ड्रॅगन ग्लास ब्लॅक अशा दोन रंगात हे घड्याळ उपलब्ध आहे. यात SpO2, स्लीप ट्रॅकिंग आणि हार्ट रेट मॉनिटरिंग सारखे फीचर्स देण्यात आलेले आहेत. 

तर प्रोबड्स टी२४ मध्ये १० मिमी ड्रायव्हर्स, क्वाड माइक ENC आणि ड्युअल पेअरिंग फीचर देण्यात आले आहे. याला ४५ तासांच्या प्ले टाइम आहे. 

Web Title: Republic Day Sale: Remember this time tomorrow, and put in the number! Lava Smart watch and earbuds will be available for Rs 26; items worth Rs 4000...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.