भारीच! TikTok युजर्सना आकर्षित करण्यासाठी Rizzleने आणला 'हा' भन्नाट प्रोग्राम, क्रिएटर्सना मिळणार अनोखी संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 02:08 PM2020-07-24T14:08:51+5:302020-07-24T14:16:36+5:30
टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर आता अल्पावधीतच रिझल हे अॅप लोकप्रिय झालं आहे. हे एक शॉर्ट व्हिडीओ अॅप असून क्रिएटर्सना एक अनोखी संधी देत आहे.
नवी दिल्ली - देशात लोकप्रिय अॅप टिकटॉकसह 59 चिनी अॅप्सवर मोदी सरकारने बंदी घातली आहे. टिकटॉकचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता. टिकटॉक सारखीच सुविधा देणारे काही अॅप्स आता वेगाने व्हायरल होत आहेत. टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर आता अल्पावधीतच रिझल हे अॅप लोकप्रिय झालं आहे. हे एक शॉर्ट व्हिडीओ अॅप असून क्रिएटर्सना एक अनोखी संधी देत आहे. TikTok युजर्सना आकर्षित करण्यासाठी Rizzleने एक भन्नाट प्रोग्राम आणला आहे. रिझलने ‘मिलियन स्टार्स रिझल प्रोग्राम’ (Million Stars Rizzle Program) लाँच केला आहे.
रिझलच्या या भन्नाट प्रोग्राममुळे भारतातील कंटेन्ट क्रिएटर्सना आपल्या कलागुणांसाठी एक चांगलं व्यासपीठ मिळणार आहे. टॉक शोज, मिनी सिरीज, कुकिंग शोज, रिव्ह्यू चॅनल्ससह आणखी बऱ्याच गोष्टींसाठी रिझल युजर्सना सातत्याने प्रोत्साहन देतं. मात्र आता रिझल टिकटॉक युजर्सना आकर्षित करत आहे. मिलियन स्टार्स रिझल प्रोग्राममुळे हजारो युजर्सना येत्या 6 ते 12 महिन्यांत आपापल्या क्षेत्रात सुपरस्टार होण्याची संधी मिळणार आहे. 3 ते 5 मिनिटांचे व्हिडीओ अपलोड करायचे आहेत.
काही निवडक 700 क्रिएटर्सना स्वत:चे चॅनल सुरू करण्यासाठी रिझल मदत करणार असून तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला देखील मिळणार आहे. रिझल क्रिएटर्सना चॅनलचे समीक्षण आणि अभिप्राय, अॅप फीचरबद्दलचे नियमित वेबिनार आणि प्रश्नोत्तरे, कार्यक्रम होस्ट करण्याची संधी देणार आहे. पहिल्या 1000 पात्र क्रिएटर्सना रिझल स्पॉन्सरशिप कूपन्सद्वारे आर्थिक सहाय्य देखील करणार आहे. याचा वापर युजर्स रिझलवर चॅनलसाठी करू शकतात. तसेच यातून त्यांना उत्पन्न मिळण्यास देखील मदत होणार आहे.
Google playstore आणि Apple app store वरून हटवले 'हे' Appshttps://t.co/2r7SWm24R4#chinaappsbanned#chinaapps#IndiaChinaFaceOff#India#technology
— Lokmat (@MiLOKMAT) July 24, 2020
रिझल अॅपमध्ये अनेक नवनवीन फीचर्स देण्यात आले आहेत. डान्स आणि गाण्यांव्यतिरिक्त इतरही अनेक शॉर्ट व्हिडीओ युजर्स तयार करू शकतात. 2019 मध्ये लाँचिंगपासून रिझलने या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट अॅपच्या स्पर्धेत जागतिक दर्जाचे व्हिडिओ अॅप सादर केले आहे. भारतातील क्रिएटर्सना अर्ज करता येणार आहे. ईमेलद्वारे अर्ज करण्याची पद्धत अगदी सोपी आहे. क्रिएटर्स अॅप डाऊनलोड करू शकतात किंवा msrp@rizzle.tv वर अर्ज करू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या
मोदी सरकारचा चीनला आणखी एक दणका; Helo Lite सहीत 'या' अॅप्सवर घालणार बंदी
CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! फक्त तीन दिवसांत देशात 1 लाख नवे रुग्ण; धडकी भरवणारा ग्राफ
CoronaVirus News : बापरे! ताज्या हवेसाठी नातेवाईकांनी कोरोनाग्रस्ताला ICUतून बाहेर आणलं अन्...
CoronaVirus News : धक्कादायक! उपचारासाठी तीन रुग्णालयांनी दिला नकार, कोरोनामुळे डॉक्टरचा मृत्यू