ेसावेडीतील रस्त्यांची लागली वाट महापालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभार : रस्त्यावरचा प्रवासाने नागरिक त्रस्त
By admin | Published: January 31, 2017 02:06 AM2017-01-31T02:06:40+5:302017-01-31T02:06:40+5:30
अहमदनगर : सावेडी उपनगरामधील महत्त्वाचे असलेल्या दोन रस्त्यांची वाट लागल्याने सामान्य नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करणे त्रासदायक झाले आहे. प्रेमदान चौक ते प्रोफेसर कॉलनी चौक आणि झोपडी कॅन्टीन ते प्रोफेसर चौक या रस्त्यांवर खड्डे पडल्याने नागरिकांना अक्षरक्ष: वाहन चालविणे कंटाळवाणे झाले आहे.
Next
अ मदनगर : सावेडी उपनगरामधील महत्त्वाचे असलेल्या दोन रस्त्यांची वाट लागल्याने सामान्य नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करणे त्रासदायक झाले आहे. प्रेमदान चौक ते प्रोफेसर कॉलनी चौक आणि झोपडी कॅन्टीन ते प्रोफेसर चौक या रस्त्यांवर खड्डे पडल्याने नागरिकांना अक्षरक्ष: वाहन चालविणे कंटाळवाणे झाले आहे.मनमाड रोडवरील प्रेमदान चौक ते प्रोफेसर कॉलनी चौक या रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्याच्या अनेक भागातील पूर्वीचे डांबरीकरण उखडले आहे. त्यामुळे रस्त्यावर खड्डे आणि ठिकठिकाणी चढउतार झाले आहेत. याच रस्त्यावर एक नामांकित व्यायामशाळा असल्याने आधीच रस्त्याच्या दुतर्फा वाहने रस्त्यावरच उभी राहतात. त्यात रस्त्याची दुर्दशा असल्याने नागरिकही रस्त्यावरून जाण्यास कंटाळले आहेत. मनमाड रोडवरून पाईपलाईन रोडकडे जाणार्या मार्गावर पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावरून मनमाड रोडकडे अथवा मनमाड रोडवरून सावेडी व पाईपलाईन रोडवर जाण्याचा मार्ग सध्या बंद आहे. त्यामुळे सर्वच नागरिक प्रेमदान चौक ते प्रोफेसर या रस्त्यांचा मार्ग ये-जा करण्यासाठी पसंत करतात. मात्र या रस्त्याची दुर्दशा झाल्याने नागरिक वैतागले आहेत.झोपडी कॅन्टीन ते तोफखाना पोलीस ठाणे ते प्रोफेसर कॉलनी या रस्त्यावरही खड्डे पडलेले आहेत. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक छोटे-मोठे अपघात येथे होत आहेत. या रस्त्याची संपूर्ण चाळण झालेली आहे. काही भागात जलवाहिन्या फुटल्याने या रस्त्यावर हमखास रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहत आहेत.दोन्ही रस्त्यांच्या मजबुतीकरण आणि डांबरीकरणाची कामे मंजूर असून त्यासाठी निधीही उपलब्ध आहे. रस्त्यामधील जलवाहिन्यांची कामे रखडल्याने तसेच खडी मिळत नसल्याचे कारण देत या रस्त्याचे काम रखडले आहे. दोन वर्षांपूर्वी रिलायन्स कंपनीने रस्ते खोदाईपोटी दिलेल्या नुकसान भरपाई निधीतून या रस्त्यांची कामे करण्यात आली होती. मात्र दोन वर्षातच रस्त्यांची दाणादाण उडाली. खडबडीत आणि ओबडधोबड रस्त्यांमुळे नागरिकांना शारीरिक वेदना सहन कराव्या लागत आहेत. दरम्यान याच रस्त्याच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप महापालिकेच्या सभेत एका नगरसेवकाने केला होता. पावसाळ्यापाठोपाठ हिवाळा संपला तरी या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले नाहीत.-------------फोटो आहेत.