घराच्या सफाईसाठी कंबर वाकवण्याची गरज नाही; अंधारात घर क्लीन करणाऱ्या Xiaomi च्या रोबोटची एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 04:15 PM2022-05-09T16:15:29+5:302022-05-09T16:15:44+5:30
शाओमीनं दोन रोबोट व्हॅक्युम क्लिनर लाँच केले आहेत, Roborock T8 Plus आणि Roborock T8 Plus Smart Dust Collection बाजारात आले आहेत.
Xiaomi च्या इकोलॉजिकल चेन पार्टनर Roborock नं नवीन रोबोट व्हॅक्युम क्लिनर सादर केला आहे. याआधी सादर केलेल्या Roborock T8 रोबोटचा अपग्रेडेड व्हर्जन Roborock T8 Plus सादर करण्यात आला आहे. यावेळी कंपनीनं सक्शन पावरमध्ये वाढ केली आहे. या रोबोटचे दोन व्हेरिएंट बाजारात आले आहेत, ज्यांचा उपयोग वेगवेगळा आहे. सध्या चीनमध्ये आलेला हा रोबोट लवकरच भारतात देखील येऊ शकतो.
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Roborock T8 Plus मध्ये एक मोठी 2.5L डस्ट बॅग मिळते जी 60 दिवस धूळ गोळा करू शकते. Roborock T8 Plus मध्ये सॉनिक व्हायब्रेशन आणि कंस्टेंट ह्यूमिडिटी मॉपिंग देण्यात आली आहे. व्हॅक्युमक्लीनर मध्ये एक फ्लॅट व्हायब्रेटिंग मॉप देण्यात आला आहे ज्यात अँटीबॅक्टीरियल मटेरियलचा वापर करण्यात आला आहे.
Roborock T8 Plus मध्ये 5100Pa पेक्षा जास्त सक्शन पावर देण्यात आली आहे. यात मेन ब्रश आणि अॅडजस्टेबल स्पीड साईड ब्रश देण्यात आला आहे जो जमिनीवरून सहज धूळ, फ्लोर गॅप डस्ट, कारपेट डस्ट इत्यादींची सफाई करतो. Roborock T8 Plus मध्ये टीपीयू सॉफ्ट रबर मटेरियल ऑम्निडायरेक्शनल फ्लोटिंग ग्लू ब्रशचा वापर करण्यात आला आहे.
यातील 3000 RPM स्पीडवर चालणारी हाय फ्रीक्वेंसी मोटार जमिनीवरील धूळ साफ करण्यासाठी डिजाईन करण्यात आली आहे. रोबोट क्लीनरमध्ये लाईट अॅक्टिव्ह रेंजिंग आणि अडथळे टाळून काम करणारी सिस्टम देण्यात आली आहे. हा रोबोट मिलीमीटर-लेव्हल 3D स्ट्रक्चर्ड लाईट रेंज पर्यंत जातो. इंफ्रारेड लाईटच्या मदतीने रोबोट अडथळ्यांचा अंदाज घेतो आणि अंधारातून देखील घर साफ करू शकतो.
किंमत
Roborock T8 Plus सीरीजमध्ये Roborock T8 Plus आणि Roborock T8 Plus Smart Dust Collection असे दोन व्हेरिएंट उतरवण्यात आले आहेत. Roborock T8 Plus ची किंमत 2,799 युआन (जवळपास 32,245 रुपये) आहे आणि Roborock T8 Plus Smart Dust Collection रोबोट व्हॅक्युम क्लिनर तुम्ही 3,598 युआन (जवळपास 41,450 रुपये) मध्ये विकत घेऊ शकाल.