भारतात Google वर 2200 कोटी रुपयांचा दंड; नेमकं कारण काय? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 02:35 PM2022-12-26T14:35:57+5:302022-12-26T14:36:23+5:30
या वर्षी ऑक्टोबरमध्ये गुगलला एकाच आठवड्यात दोनदा दंड ठोठावण्यात आला होता.
टेक जायंट Googleवर ऑक्टोबरमध्ये 2200 कोटी रुपयांहून अधिकचा दंड ठोठावण्यात आला होता. कंपटीशन कमिशन ऑफ इंडिया (CCI) ने हा दंड ठोठावला होता. आता गुगल या 2200 कोटी रुपयांहून अधिक दंडाच्या विरोधात राष्ट्रीय कंपनी कायदा अपीलीय न्यायाधिकरण (NCLAT) कडे जाणार आहे.
या वर्षी ऑक्टोबरमध्ये गुगलला एकाच आठवड्यात दोनदा दंड ठोठावण्यात आला होता. भारताने अँटी-कंपीटिटिव्ह प्रॅक्टिससाठी सीसीआयने हा दंड ठोठावला आहे. कंपनीला एकूण 2274 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. गुगलवर अँड्रॉइड स्पेसमधील आपल्या अव्वल स्थानाचा गैरफायदा घेत स्पर्धेत पुढे राहण्याचा आरोप आहे. यापूर्वी अँटी-कंपीटिटिव्ह प्रॅक्टिससाठी 1337 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. त्यानंतर याच कारणावरून कंपनीला 936.44 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. म्हणजेच कंपनीला एकूण 2274 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
गुगलला दंड का करण्यात आला?
वर नमूद केल्याप्रमाणे गुगलला दोनदा दंड ठोठावण्यात आला आहे. अँड्रॉइड इकोसिस्टममधील त्याच्या स्थानाचा गैरफायदा घेतल्याचा गुगलवर आरोप आहे. CCI ने Play Store धोरणाशी संबंधित अँटी-कंपीटिटिव्ह प्रॅक्टिससाठी दंड ठोठावला आहे. गुगल प्ले स्टोअर पॉलिसीमुळे, गुगलला बाजारात रिलीज झालेल्या अॅप्सचा फायदा मिळतो.
Google धोरणामुळे, अॅप डेव्हलपर Android अॅपवर खरेदी करण्यासाठी युजर्सना फक्त Google Play बिलिंग सिस्टम म्हणजेच GPBS चा पर्याय देऊ शकतात. गूगलकडे पर्यायी पेमेंट पद्धत पर्याय किंवा थेट लिंक नाही. म्हणजेच, युजर्सना हवे असले तरी ते Play Store बिलिंग व्यतिरिक्त क्रेडिट किंवा डेबिट कार्डने डेव्हलपरला पैसे देऊ शकत नाहीत. सीसीआयने म्हटले की, अँड्रॉइड स्मार्ट मोबाइल ओएस आणि परवानाधारक ओएस स्मार्ट मोबाइल डिव्हाइसवर गुगलचे वर्चस्व आहे. हे अॅप डेव्हलपरला Google Play बिलिंग सिस्टम वापरण्यास भाग पाडते. जे पूर्णपणे चुकीचे आहे. यामुळे त्याला दंड ठोठावण्यात आला आहे.
हे देखील कारण आहे
मोबाईल ऍप्लिकेशन वितरण करार किंवा MADA सारख्या Android करारांचे उल्लंघन केल्याबद्दल Google ला प्रथम दंड ठोठावण्यात आला. MADA हा एक करार आहे जो Google मोबाइल उत्पादकांसोबत करतो. यामध्ये अँड्रॉईड मोबाईलमध्ये सर्च, यूट्यूब, जीमेल सारखे प्री-लोड केलेले गुगल अॅप्स दिले आहेत. तुम्ही नवीन फोन घेतला तर त्यामध्ये Gmail, YouTube सारखे अनेक Google अॅप्स आधीच इन्स्टॉल केलेले असतात. यामुळे गुगलच्या या अॅप्सना इतर अॅप्सच्या तुलनेत खूप फायदा मिळतो. म्हणजेच जितके अँड्रॉइड मोबाईल तितके अॅप्स. याचा थेट फायदा गुगलला होतो तर उर्वरित विकासकांना त्याचा फटका बसतो.