WhatsApp वर चालतोय '50 रुपये'वाला स्कॅम, बँक अकाउंट होईल मिनिटात साफ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 10:59 AM2023-02-19T10:59:56+5:302023-02-19T11:00:24+5:30

या अ‍ॅपच्या माध्यमाने सायबर क्रिमिनल्स आपली सर्वप्रकारची फायनांशिअल माहिती मिळवतात. यात पासवर्ड्ससह ओटीपी आणि ईमेल सारख्या गोष्टींचाही समावेश आहे.

Rs 50 scam running on WhatsApp Beware of rs 50 whatsapp scam bank account will be cleared in minutes | WhatsApp वर चालतोय '50 रुपये'वाला स्कॅम, बँक अकाउंट होईल मिनिटात साफ

WhatsApp वर चालतोय '50 रुपये'वाला स्कॅम, बँक अकाउंट होईल मिनिटात साफ

googlenewsNext

WhatsApp हे पॉप्युलर इंस्टन्ट मॅसेजिंग अ‍ॅप असल्याने सातत्याने स्कॅमर्सच्या रडारवर असते. स्कॅमर्स WhatsApp च्याम माध्यमाने लोकांची फसवणूक करण्याच प्रयत्नात असतात. स्कॅमर्स विविध पद्धतीने लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असतात. आता नवा स्कॅम 'Rs. 50 per like' सुरू झाला आहे.

जॉब संदर्भातील मॅसेजच्या नावावर स्कॅम -
स्कॅमर्स युजर्सना जॉब संदर्भात मैसेज सेंड करतात. यानंतर, जेव्हा एखादी व्यक्ती त्यांच्याकडून जॉब संदर्भात माहिती घेते, तेव्हा ते तिला यूट्यूब व्हिडिओ लाईक केल्यास पैसे मिळतील असे सांगतात. महत्वाचे म्हणजे, यूट्यूब व्हिडिओ लाइक करून रोज 5000 रुपये कमावले जाऊ शकतात, असादावाही ते करतात, असे समोर आले आहे.

यासाठी स्कॅमर्स केवळ व्हॉट्सअ‍ॅपच नाही, तर LinkedIn आणि फेसबुकच्या माध्यमानेही लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. माध्यमांतील वृत्तांनुसार, स्कॅमर्स सर्वप्रथम जॉब संदर्भात माहिती देतात. ते सांगतात, की लिमिटेड जागाच शिल्लक आहेत. तसेच, यासाठी अप्लाय करायची इच्छा असेल, तर स्लॉट रिझर्व्ह करू शकतात.

पेमेंट ट्रान्सफरच्या नावाने होते फसवणूक -  
यानंतर, व्हिक्टिमने मेसेजला रिप्लाय देताच, स्कॅमर त्यांना कॉल करतात आणि YouTube व्हिडिओ लाइक करण्यासाठी पैसे दिले जातील, असे सांगतात. एवढेच नाही, तर व्हिक्टिमला विश्वास बसावा यासाठी ते सुरुवातीला काही अमाउंट देखील देतात. यावर, व्हिक्टिमचा विश्वास जिंकल्यानंतर, ते त्यांना पेमेंट ट्रान्सफरमध्ये काही समस्या येत असल्याचे सांगून, सहजपणे पेमेंट ट्रान्सफर व्हावे यासाठी एक अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगतात. 

या अ‍ॅपच्या माध्यमाने सायबर क्रिमिनल्स आपली सर्वप्रकारची फायनांशिअल माहिती मिळवतात. यात पासवर्ड्ससह ओटीपी आणि ईमेल सारख्या गोष्टींचाही समावेश आहे. या स्कॅमपासून सुरक्षित राहणेही अत्यंत सोपे आहे. यासाठी आपल्याला केवळ अशा मेसेजसकडे दुर्लक्ष करायचे आहे.

Web Title: Rs 50 scam running on WhatsApp Beware of rs 50 whatsapp scam bank account will be cleared in minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.