50000 रुपयांचा मोबाईल 7500 ने स्वस्त होणार; इंपोर्ट ड्यूटी कमी केल्याचे आणखी काही फायदे...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 11:26 AM2024-02-01T11:26:51+5:302024-02-01T11:27:08+5:30

गेल्या १० वर्षांपासून कंपन्या आयात शुल्कात कपात करण्याची मागणी करत होत्या. परंतु या कंपन्या भारताबाहेर मोबाईल उत्पादन करत असल्याने भारत सरकार यासाठी तयार नव्हते.

Rs 50000 mobile will be cheaper by Rs 7500 after import Duty reduced; Some more benefits of reducing import duty before Budget Session 2024 | 50000 रुपयांचा मोबाईल 7500 ने स्वस्त होणार; इंपोर्ट ड्यूटी कमी केल्याचे आणखी काही फायदे...

50000 रुपयांचा मोबाईल 7500 ने स्वस्त होणार; इंपोर्ट ड्यूटी कमी केल्याचे आणखी काही फायदे...

देशात स्मार्टफोन क्रांती घेऊन आला आहे. करोडो लोक एकमेकांसोबत जोडले गेले आहेत. फाईव्ह जी सेवा बहुतांश ठिकाणी सुरु झाली आहे. अशावेळी केंद्र सरकारने बजेटपूर्वी मोबाईल फोनच्या सुट्या भागांवर आकारली जाणारा आयात कर कमी केला आहे. यामुळे ५०००० रुपयांचा फोन साडे सात हजारांनी तर आयफोनसारखा महागडा लाख रुपयांचा फोन १५००० रुपयांनी कमी होणार आहे. 

इंपोर्ट ड्युटीमध्ये ५ टक्के कपात करण्यात आली आहे. यामुळे किंमत कमी होण्याबरोबरच आणखी काही फायदे देखील देशाला होणार आहेत. बॅटरी, मेन लेन्स आणि अन्य सुटे भाग यामध्ये १० टक्क्यांची कपात होऊ शकते. भारताच्या अर्थव्यवस्थेला याचा डबल स्पीडने फायदा होणार आहे. स्मार्टफोन बनविण्याचा खर्च कमी होणार आहे. यामुळे मोबाईल मॅन्युफॅक्चरींगमध्ये वाढ होणार आहे. 

यामुळे अधिक रोजगार उपलब्ध होणार आहेत. रोजगार उपलब्ध झाले तर भारताच्या अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे. सरकारने मोबाईल फोन आणि त्याच्या पार्ट्सवरील आयात शुल्क हटवल्याने हाय-एंड स्मार्टफोनच्या निर्मितीला वेग येईल. कमी किंमतीच्या स्मार्टफोनच्या किंमती देखील त्या प्रमाणात कमी होतील. परंतु Apple, Samsung, Vivo आणि Oppo च्या स्मार्टफोन्सच्या किंमती मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहेत. भारतात विकले जाणारे ९९.२ टक्के मोबाईल फोन देशातच बनवले जातात.

गेल्या १० वर्षांपासून कंपन्या आयात शुल्कात कपात करण्याची मागणी करत होत्या. परंतु या कंपन्या भारताबाहेर मोबाईल उत्पादन करत असल्याने भारत सरकार यासाठी तयार नव्हते. आता भारतातच मेड इन स्मार्टफोन बनू लागले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होत आहे. याला बुस्टर मिळण्यासाठी त्यांचे पार्ट्सचे दर कमी करण्यासाठी कर कमी करण्यात आला आहे. 
 

Web Title: Rs 50000 mobile will be cheaper by Rs 7500 after import Duty reduced; Some more benefits of reducing import duty before Budget Session 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.