जबरदस्त! तब्बल 8500mAh बॅटरीसह लाँच झाला 'हा' स्मार्टफोन; उंचावरून पडून देखील नाही तुटणार 

By सिद्धेश जाधव | Published: June 23, 2021 03:33 PM2021-06-23T15:33:47+5:302021-06-23T15:34:36+5:30

Doogee S97 Pro launch: Doogee S97 Pro हा मिल्ट्री ग्रेड स्मार्टफोन चिनी कंपनी Doogee ने सादर केला आहे.  

rugged smartphone Doogee S97 Pro official with laser rangefinder 8500mah battery  | जबरदस्त! तब्बल 8500mAh बॅटरीसह लाँच झाला 'हा' स्मार्टफोन; उंचावरून पडून देखील नाही तुटणार 

फोटोग्राफीसाठी Doogee S97 Pro क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

googlenewsNext

Rugged स्मार्टफोन्सची एक श्रेणी आहे ज्यात दणकट, टिकाऊ आणि मजबूत फोन्स लाँच केले जातात. हे फोन्स मेहनतीची कामे करणाऱ्या तसेच कठीण परिस्थितीत काम करणाऱ्या लोकांना लक्षात ठेऊन बनवण्यात येतात. असाच एक स्मार्टफोन मोटोरोलाने काही दिवसांपूर्वी लाँच केला होता. तसेच, आता अजून एका ब्रँड Doogee ने असाच पावरफुल Rugged SmartPhone Doogee S97 Pro नावाचा स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये Laser rangefinder आणि 8,500 mAh battery देखील देण्यात आली आहे.  

Doogee S97 Pro ची वैशिष्ट्ये  

Doogee S97 Pro हा एक MILSTD-810G सर्टिफाइड स्मार्टफोन आहे. यामुळे हा उंचावरून पडून देखील सुरक्षित राहू शकतो. तसेच पाणी आणि धुळीपासून संरक्षण व्हावे म्हणून यात IP68 आणि IP69K रेटिंग देखील देण्यात आली आहे. त्याचबरोबर यात Laser rangefinder देण्यात आला आहे. या प्रोफेशनल लेजर टेक्नॉलॉजीच्या मदतीने 40 मीटरपर्यंतचे अंतर मोजता येते. या स्मार्टफोनमध्ये 8 मेजरींग मोड्स आहेत.  

Doogee S97 Pro चे स्पेसिफिकेशन्स 

Doogee S97 Pro मध्ये 1560 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.39 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या अँड्रॉइड 11 स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकचा हीलियो जी95 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. 

फोटोग्राफीसाठी Doogee S97 Pro क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या मागे 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रावाईड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. तसेच फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो.  

साईड माऊंटेड फिंगरप्रिंटसह Doogee S97 Pro मध्ये 8,500एमएएचची भलीमोठी बॅटरी देण्यात आली आहे. हि बॅटरी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीच्या मदतीने चार्ज करता येते. या फोनमध्ये 10वॉट व्हायरलेस चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. या फोनची किंमत $329.99 म्हणजे अंदाजे 24,600 रुपये आहे. 

Web Title: rugged smartphone Doogee S97 Pro official with laser rangefinder 8500mah battery 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.