सॅमसंगच्या स्मार्टफोनमध्ये युपीआयवर आधारित पेमेंट सिस्टीम
By शेखर पाटील | Published: July 28, 2017 07:43 PM2017-07-28T19:43:29+5:302017-07-28T19:44:29+5:30
सॅमसंगने आपला गॅलेक्सी ऑन मॅक्स हा स्मार्टफोन भारतात फ्लिपकार्ट या शॉपिंग पोर्टलवरून उपलब्ध केला असून याची खासियत म्हणजे यात युपीआय प्रणालीवर आधारित पेमेंट सिस्टीम देण्यात आली आहे.
सॅमसंगने आपला गॅलेक्सी ऑन मॅक्स हा स्मार्टफोन भारतात फ्लिपकार्ट या शॉपिंग पोर्टलवरून उपलब्ध केला असून याची खासियत म्हणजे यात युपीआय प्रणालीवर आधारित पेमेंट सिस्टीम देण्यात आली आहे.
सॅमसंगने अलीकडेच भारतात सॅमसंग पे ही पेमेंट सिस्टीम लाँच केली आहे. याला केंद्र सरकारच्या ‘युपीआय’शी अटॅच करण्यात आले आहे. ही प्रणाली सॅमसंग गॅलेक्सी ऑन मॅक्सच्या माध्यमातून भारतीय ग्राहकांना प्रदान करण्यात आली आहे. याशिवाय यात फिंगरप्रिंट सेन्सरही असेल. उर्वरित फिचर्सचा विचार करता यात ५.७ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी अर्थात १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. ऑक्टॉ-कोअर मीडियाटेक एमटीकेपी २५ प्रोसेसर असणार्या या मॉडेलची रॅम चार जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. याचे मुख्य आणि फ्रंट हे दोन्ही कॅमेरे प्रत्येकी १३ मेगापिक्सल्स क्षमतांचे तर बॅटरी ३३०० मिलीअँपिअर क्षमतेची असेल. सॅमसंग गॅलेक्सी ऑन मॅक्स हा स्मार्टफोन ग्राहकांना फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून १६,९९० रूपयात खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.