रेडमी वाय 1आणि वाय 1 लाईटची आजपासून विक्री सुरू : जाणून घ्या सर्व फिचर्स

By शेखर पाटील | Published: November 8, 2017 01:57 PM2017-11-08T13:57:36+5:302017-11-09T15:51:09+5:30

शाओमी कंपनीने अलीकडेच जाहीर केलेल्या रेडमी वाय१ आणि वाय लाईट या दोन स्मार्टफोनची आजपासून विक्री सुरू होत आहे.

Sales from Redmi Y1, Y1 Lite starts today: Know all the features | रेडमी वाय 1आणि वाय 1 लाईटची आजपासून विक्री सुरू : जाणून घ्या सर्व फिचर्स

रेडमी वाय 1आणि वाय 1 लाईटची आजपासून विक्री सुरू : जाणून घ्या सर्व फिचर्स

Next

शाओमी कंपनीने अलीकडेच जाहीर केलेल्या रेडमी वाय१ आणि वाय लाईट या दोन स्मार्टफोनची आजपासून विक्री सुरू होत आहे.
शाओमी रेडमी वाय १ हा स्मार्टफोन ३ जीबी रॅम/३२ जीबी स्टोअरेज तसेच ४ जीबी रॅम/६४ जीबी स्टोअरेज या दोन व्हेरियंटमध्ये अनुक्रमे १०,९९९ आणि ८,९९९ रूपयात उपलब्ध करण्यात आला आहे. तर रेडमी वाय १ लाईट हा स्मार्टफोन ६,९९९ रूपये मूल्यात मिळेल. हे दोन्ही स्मार्टफोनची आज दुपारी १२.०० वाजेपासून शाओमी कंपनीच्या मी.कॉम आणि अमेझॉन इंडिया या पोर्टलवरून विक्री सुरू होत असून ग्राहकांना हे मॉडेल्स ऑफलाईन पध्दतीनेही खरेदी करता येतील.
शाओमी रेडमी वाय १ या मॉडेलमध्ये सेल्फी लाईटसह १६ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याच्या मदतीने अतिशय उत्तम दर्जाच्या सेल्फी प्रतिमा काढता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर यातील मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सल्सचा असेल. या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि एचडी क्षमतेचा (१२८० बाय ७२० पिक्सल्स) डिस्प्ले असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लासचे संरक्षक आवरण असेल. यात ६४ बीट ऑक्टॉ-कोई क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४३५ प्रोसेसर आहे. या मॉडेलचे ३ जीबी रॅम/३२ जीबी स्टोअरेज आणि ४ जीबी रॅम.६४ जीबी स्टोअरेज या दोन्ही व्हेरियंटमध्ये मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत स्टोअरेज वाढविण्याची सुविधा असेल. यातील बॅटरी ३०८० मिलीअँपिअर क्षमतेची असेल.  
शाओमी रेडमी वाय १ लाईट या मॉडेलमध्ये आधीच्या मॉडेलपेक्षा थोड्या कमी प्रमाणात फिचर्स देण्यात आले आहेत. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४२५ प्रोसेसर असेल. याची रॅम दोन जीबी आणि स्टोअरेज १६ जीबी असून मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने याला वाढविण्याची सुविधा असेल. तर यातील सेल्फी कॅमेरा ५ मेगापिक्सल्स क्षमतेचा तर रिअर कॅमेरा १३ मेगापिक्सल्सचा असेल. तर यातील उर्वरित फिचर्स हे रेडमी वाय १ या मॉडेलप्रमाणेच असतील. हे दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीवर आधारित एमआययुआर ८ वर चालणारे असतील.
 

Web Title: Sales from Redmi Y1, Y1 Lite starts today: Know all the features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :xiaomiशाओमी