Samsung 5G Laptop: वायफायची गरजच संपली! 5G सपोर्टवाला सॅमसंगचा लॅपटॉप आला; १ जीबीचा स्पीड फुकट...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 12:35 PM2023-01-18T12:35:06+5:302023-01-18T12:35:37+5:30

सध्या अनेकजण घरातून कंपन्यांचे काम करत आहेत. यामुळे घरात वायफायची गरज आहे. बाहेर काम करताना देखील त्यांना मोबाईल हॉटस्पॉट लावावा लागत आहे.

Samsung 5G Laptop: The need for WiFi is gone! Samsung's laptop with 5G support arrives; 1GB Speed Free... | Samsung 5G Laptop: वायफायची गरजच संपली! 5G सपोर्टवाला सॅमसंगचा लॅपटॉप आला; १ जीबीचा स्पीड फुकट...

Samsung 5G Laptop: वायफायची गरजच संपली! 5G सपोर्टवाला सॅमसंगचा लॅपटॉप आला; १ जीबीचा स्पीड फुकट...

Next

देशात आता फाईव्ह जी सुरु झाले आहे. एअरटेल आणि जिओने सध्या तरी ट्रायल पिरिएडमध्ये फुकटात फाईव्ह जी दिले आहे. फोरजीचे रिचार्ज असेल आणि फाईव्हजीचा मोबाईल असेल तर त्याच पैशांत फाईव्हजी वापरता येत आहे. अशातच आता लॅपटॉपलाही हा भन्नाट स्पीड मिळत असेल तर...

सध्या अनेकजण घरातून कंपन्यांचे काम करत आहेत. यामुळे घरात वायफायची गरज आहे. बाहेर काम करताना देखील त्यांना मोबाईल हॉटस्पॉट लावावा लागत आहे. यामुळे सॅमसंगने आता फाईव्ह जीचे सिमकार्ड टाकता येणारा लॅपटॉप लाँच केला आहे. 

Galaxy Book2 Go 5G हा Galaxy Book Go सिरीजचा नवीन मेंबर आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने Galaxy Book2 Go आणला होता. गॅलॅक्सी बुक२ गो ५जी मध्ये स्नॅपड्रॅगन 7c+ Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. या लॅपटॉपला १४ इंचाचा फुल एचडी आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. 

Samsung Galaxy Book2 Go 5G सध्या UK मध्ये लॉन्च झाला आहे. 4GB RAM सह 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत GBP649 म्हणजेच सुमारे 64,900 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 8 GB रॅम सह 256 GB स्टोरेजची किंमत GBP749 आहे, म्हणजे सुमारे 74,900 रुपये. लवकरच भारतीय बाजारातही सॅमसंग हा लॅपटॉप लाँच करण्याची शक्यता आहे. 

Galaxy Book2 Go 5G मध्ये eSIM+pSIM कनेक्टिव्हिटी आहे. विंडोज ११ होम ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली आहे. ग्राफिक्ससाठी यात Qualcomm Adreno GPU आहे. लॅपटॉपला 8 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेज मिळेल. 

सॅमसंगकडे एचडी वेबकॅम आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, Wi-Fi 6E (802.11ax), ब्लूटूथ, 5G ENDC आणि USB Type-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक आहे. यात नॅनो सिम स्लॉट आहे. Galaxy Book2 Go 45W चार्जिंगला सपोर्ट असलेली 42.3Wh बॅटरी पॅक करते.

Web Title: Samsung 5G Laptop: The need for WiFi is gone! Samsung's laptop with 5G support arrives; 1GB Speed Free...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.