सॅमसंगचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन येतोय भारतात; लाँच डेट आली समोर
By सिद्धेश जाधव | Published: June 30, 2022 03:53 PM2022-06-30T15:53:36+5:302022-06-30T15:54:05+5:30
Samsung Galaxy M13 5G स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची माहिती मिळाली आहे.
Samsung चा आपले मिड रेंज स्मार्टफोन Galaxy M या सीरिजमध्ये सादर करते. या सीरिजमध्ये लवकरच एका 5G स्मार्टफोनची भर टाकली जाऊ शकते. येत्या 5 जुलैला भारतात Samsung Galaxy M13 5G स्मार्टफोन लाँच केला जाऊ शकतो. अशी माहिती 91mobiles नं दिली आहे. या हँडसेटची निर्मिती सुरु झाल्याची माहिती पब्लिकेशननं दिली आहे.
Samsung नं ट्वीटरवर एक पोस्ट शेयर करून सांगितलं आहे की कंपनी लवकरच नवीन Galaxy M सीरीजचा स्मार्टफोन लाँच करणार आहे. या पोस्टमध्ये माहिती देण्यात आली आहे की सॅमसंगचा हा फोन 5 जुलैला लाँच करण्यात येईल. कंपनीनं या हँडसेटच्या नावाची माहिती दिली नाही परंतु हा Samsung Galaxy M13 5G असू शकतो, असा अंदाज लावला जात आहे. जो ब्लू, ब्राउन आणि ग्रीन कलर ऑप्शनमध्ये सादर केला जाऊ शकतो.
Samsung Galaxy M13 5G चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy M13 5G स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा Full-HD+ LCD डिस्प्ले पॅनल असेल. हा फोन MediaTek Dimensity 700 प्रोसेसरसह बाजारात येऊ शकतो. सोबत सॅमसंगच्या या फोनमध्ये 6GB पर्यंतचा रॅम आणि 128GB स्टोरेज मिळू शकते. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात येईल, जी 15W चार्जिंगला सपोर्ट करेल.
Samsung Galaxy M13 5G स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल. या फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा सेकंडरी सेन्सर असेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.