Samsung नं ग्राहकांना फसवलं! पाण्यात देखील स्मार्टफोन सुरक्षित असल्याचा दावा खोटा  

By सिद्धेश जाधव | Published: June 24, 2022 12:02 PM2022-06-24T12:02:29+5:302022-06-24T12:02:41+5:30

काही स्मार्टफोन्सची चुकीची मार्केटिंग केल्याचं Samsung नं मान्य केलं आहे. त्यामुळे आता मोठा दंड भरावा लागणार आहे.  

Samsung admits to misleading consumers by fake marketing campaign has to pay huge fine in australia | Samsung नं ग्राहकांना फसवलं! पाण्यात देखील स्मार्टफोन सुरक्षित असल्याचा दावा खोटा  

Samsung नं ग्राहकांना फसवलं! पाण्यात देखील स्मार्टफोन सुरक्षित असल्याचा दावा खोटा  

Next

ऑस्ट्रेलियन कॉम्पिटिशन अँड कंज्यूमर कमिशन (ACCC) नं एका प्रेस रिलीजमधून माहिती दिली आहे की, सात स्मार्टफोन्समधील वॉटर रेजिस्टेंस फीचरबाबत चुकीची मार्केटिंग केल्याची कबुली सॅमसंगनं दिली आहे. याबाबत खोट्या जाहिराती प्रकाशित करण्यात आल्या होत्या त्यामुळे दक्षिण कोरियन कंपनीला दंड भरावा लागणार आहे.  

सॅमसंगनं युजर्सना फसवलं 

ACCC च्या तपासाअंती समोर आले आहे की, सॅमसंगनं मार्च 2016 ते ऑक्टोबर 2018 या कालावधीत 9 दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकाशित केल्या होत्या. या सर्व जाहिराती फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, सॅमसंग वेबसाईट आणि सॅमसंगच्या स्टोर्सवर चालवल्या जात होत्या. जाहिरातींमध्ये सॅमसंगचे फोन्स स्विमिंग पूल किंवा समुद्रात वापरता येतात, असं दाखवण्यात आलं होतं.  

आता सॅमसंगनं मान्य केलं आहे की Galaxy S7, S7 Edge, A5 (2017), A7 (2017), S8, S8 Plus, आणि Note 8 हे फोन्स स्विमिंग पूल किंवा समुद्रातील पाण्यात गेल्यानंतर त्यांचं चार्जिंग पोर्ट बिघडतं. परंतु या जाहिरातींमुळे ऑस्ट्रेलियामध्ये हा फोन्सची विक्री वाढली होती. जेव्हा फोन्स बिघडू लागले तेव्हा ग्राहकांनी तक्रार करण्यास सुरुवात केली. काही युजर्सचे स्मार्टफोन तर पूर्णपणे निकामी होत होते.  

दंडात्मक कारवाई 

ग्राहकांच्या तक्रारींची दाखल घेत ACCC नं तपास सुरु केला. त्यानंतर सॅमसंगनं चुकीची जाहिरात केल्याचं मान्य केलं. त्यामुळे सॅमसंगला 14 मिलियन ऑस्ट्रेलीयन डॉलर्स इतका दंड ठोठावण्यात आला आहे. भारतीय चलनात हा दंड सुमारे 75 कोटी रुपयांपेक्षा देखील जास्त आहे.  

Web Title: Samsung admits to misleading consumers by fake marketing campaign has to pay huge fine in australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.