Samsung ने मुंबईत सुरू केलं पहिलं 'ऑनलाईन टू ऑफलाईन' स्टोर; 'हे' 8 झोन्स करणार कमाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 03:50 PM2024-01-24T15:50:35+5:302024-01-24T15:57:26+5:30
मुंबईतील ग्राहकांना Samsung.com/in वरून ऑनलाईन खरेदी करण्याची आणि दोन तासांच्या आत सॅमसंग बीकेसी येथून त्यांनी ऑर्डर केलेली उत्पादनं पिक-अप करण्याची देखील सुविधा देण्यात आली आहे.
सॅमसंग कंपनीने मुंबईतील जिओ वर्ल्ड प्लाझा मॉलमध्ये भारतातील त्यांच्या पहिल्या ऑनलाईन-टू-ऑफलाईन लाइफस्टाईल स्टोअरचं उद्घाटन केलं आहे. या नवीन स्टोअरमध्ये सॅमसंगच्या एआय इकोसिस्टमच्या क्षमतेचा फायदा घेत स्मार्टफोन्स, टेलिव्हिजन्स, रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स आणि इतर उत्पादनांचा प्रीमियम पोर्टफोलियो दाखवण्यात आला आहे.
सॅमसंग बीकेसी एकाच छताखाली प्रिमिअम ग्राहक व तंत्रज्ञानप्रेमींच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी सॅमसंगचा आधुनिक एआय अनुभव देते. मुंबईतील ग्राहकांना Samsung.com/in वरून ऑनलाईन खरेदी करण्याची आणि दोन तासांच्या आत सॅमसंग बीकेसी येथून त्यांनी ऑर्डर केलेली उत्पादनं पिक-अप करण्याची देखील सुविधा देण्यात आली आहे.
ग्राहक सॅमसंग बीकेसी येथे नवीन गॅलॅक्सी S24 सिरीजचा अनुभव घेण्यासह प्री-बुकिंग करू शकतील. सॅमसंग बीकेसी आठ अद्वितीय लाइफस्टाईल झोन्समध्ये विभागण्यात आलं आहे, जे सॅमसंग कनेक्टेड मल्टी-डिवाईस इकोसिस्टमचा भाग म्हणून ग्राहकांना देणाऱ्या सोयीसुविधा दाखवेल.
आठ लाइफस्टाईल झोन्समध्ये हॉबी रूम, होम ऑफिस, होम अटेलियर, होम कॅफे, कनेक्टेड किचन, इंटेलिजंट क्लोसेट, प्रायव्हेट सिनेमा, मोबाइल झोन यांचा समावेश आहे. आठ झोन्समधील सर्व अनुभव एकत्रित करण्यासाठी सॅमसंग आपल्या लर्न @ सॅमसंग उपक्रमाचा भाग म्हणून डिजिअल आर्ट, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, फिटनेस आणि बेकिंग, कुकिंग, म्युझिक अशा ग्राहक आवडींसंदर्भात विविध इव्हेंट्स व वर्कशॉप्सचे देखील आयोजन करेल.
ग्राहकांसोबत दीर्घकालीन चांगले संबंध निर्माण करण्यासाठी स्टोअरमध्ये इंटीग्रेटेड सर्व्हिस सेंटर देखील आहे, जेथे ते ऑनलाईन आणि ऑफलाईन अपॉइन्टमेंट्स घेऊ शकतात आणि त्यांच्या डिव्हाईसच्या सर्व्हिससाठी पिकअपची विनंती करू शकतात. स्टोअर ग्राहकांना एकाच दिवसात गॅलॅक्सी डिव्हाईसची दुरुस्ती आणि रिमोट असिस्टंट सर्व्हिस देखील देईल.