Samsung च्या सीईओंनी मागितली मोबाईल ग्राहकांची जाहीर माफी; स्वतःहून दिली 'या' मोठ्या चुकीची कबुली
By सिद्धेश जाधव | Published: March 17, 2022 04:03 PM2022-03-17T16:03:05+5:302022-03-17T16:07:36+5:30
Samsung च्या सीईओंनी बेंचमार्किंग स्कोर प्रकरणामुळे ग्राहकांची माफी मागितली आहे.
Samsung चे VC आणि CEO जॉन्ग ही हान यांनी GoS अॅपमुळे डिवाइसच्या बेंचमार्किंगमध्ये होणाऱ्या बदलांमुळे माफी मागितली आहे. कंपनीच्या वार्षिक सर्व साधारण बैठकीत मान्य केलं की, “सॅमसंगनं ग्राहकांची चिंता ऐकून घेतली नाही. यापुढे कंपनी ग्राहकांचं म्हणणं अधिक काळजीपूर्वक ऐकून घेईल.” चला जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय आहे ते.
अशी आहे गडबड
सॅमसंग आपल्या स्मार्टफोनमध्ये Games Optimization Service (GOS) चा वापर करते. ही सर्व्हिस 10,000 पेक्षा जास्त अॅप्सची परफॉर्मन्स स्लो डाउन करते आणि गेमिंग अॅप्सची परफॉर्मन्स वाढवते. तसेच अनेक गेम्स देखील या सर्व्हिसमुळे स्लो होत आहेत. त्याचबरोबर हे फोन Instagram, TikTok, Twitter, आणि 6,800 पेक्षा जास्त अॅप्स थ्रोटल करतात.
विशेष म्हणजे GOS बेंचमार्किंग प्लॅटफॉर्म्स 3DMark, AnTuTu, PCMark, GFXBench, आणि Geekbench 5 यांच्या परफॉर्मन्सवर प्रभाव टाकत नाही. त्यामुळे सॅमसंगच्या स्मार्टफोन्सचे बेंचमार्क स्कोर चांगले येतात आणि रोजच्या वापरातील अॅप्स मात्र स्लो होतात. GOS अॅप्स ओळखून अॅक्टिव्हेट होते, असं गिकबेंचला दिसून आलं आहे.
सर्वप्रथम ही गडबड Samsung Galaxy S22, Galaxy S21, Galaxy S20 आणि Galaxy S10 सीरीजच्या फोन्समध्ये दिसून आली. त्यामुळे गिकबेंचनं हे फोन्स आपल्या प्लॅटफॉर्मवरून बॅन केले. त्यानंतर प्रीमियम टॅबलेट सीरीजमधील Tab S8+ आणि Tab S8 Ultra देखील GoSमुळे गिकबेंचवरून अनलिस्ट करण्यात आले आहेत.
Samsung चा उपाय
Samsung नं हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर दक्षिण कोरियामध्ये Galaxy S22 Series वर एक सॉफ्टवेयर अपडेट जारी केला आहे. यामुळे डिवाइसच्या CPU आणि GPU च्या रिजल्टवर GOS चा प्रभाव पडत नाही. हा अपडेट या सीरीजच्या जुना मॉडेल्ससाठी देखील रोल आउट केला जाईल.