ना ओप्पो, ना विवो, शाओमीलाही झेपलं नाही! ‘या’ कंपनीनं काही दिवसांत केली 1500 कोटी रुपयांच्या फोन्सची विक्री
By सिद्धेश जाधव | Published: March 11, 2022 01:17 PM2022-03-11T13:17:24+5:302022-03-11T13:18:44+5:30
Samsung Galaxy S22: फक्त 12 तासांमध्ये 70 हजारांपेक्षा जास्त Samsung Galaxy S22 मॉडेल्सची प्री-बुकिंग करण्यात आली होती.
Samsung Galaxy S22: Samsung च्या S22 सीरीज काही दिवसांपूर्वी लाँच झाली आहे. या सीरिजचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. फक्त 12 तासांमध्ये 70 हजारांपेक्षा जास्त मॉडेल्सची प्री-बुकिंग करण्यात आली होती. आता बातमी आली आहे कि आतापर्यंत गॅलेक्सी S22 सीरीजचे 1,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे फोन्स कंपनीनं विकले आहेत.
15 दिवसांपूर्वी फ्लॅगशिप गॅलेक्सी S22 सीरीज भारतात आली आहे. ही सीरिज प्रीमियम स्मार्टफोन्स सेगमेंटमध्ये अॅप्पलसह शाओमी, वनप्लस, ओप्पो आणि विवोला टक्कर देत आहे. परंतु यातूनही ग्राहक सॅमसंगला पसंती देत असल्याचं या बातमीमधून दिसतंय.
Samsung Galaxy S22 सीरिजची किंमत
भारतात सॅमसंग गॅलेक्सी एस22 च्या 8GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 72,999 रुपये आणि 8GB + 256GB मॉडेलची किंमत 76,999 रुपये ठेवण्यात आली आहे. गॅलेक्सी S22+ 8GB + 128GB मॉडेलसाठी 84,999 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिएंटसाठी 88,999 रुपये मोजावे लागतील. सॅमसंग गॅलेक्सी S22 अल्ट्राच्या के 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 1,09,999 रुपये आहे. तर 12GB + 512GB मॉडेलची किंमत 1,18,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
Samsung Galaxy S22 Series चे स्पेसिफिकेशन
Samsung पहिल्यांदाच भारतात Snapdragon प्रोसेसरसह Galaxy S Series चे स्मार्टफोन सादर करत आहे. त्यामुळे Galaxy S22, Galaxy S22+ आणि Galaxy S22 Ultra मध्ये Exynos 2200 प्रोसेसरच्या ऐवजी Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर देण्यात येईल. यात Android 12 बेस्ड OneUI 4.0 मिळेल.
Samsung Galaxy S22 आणि Galaxy S22+ हे दोन फोन्स 8GB/128GB आणि 8GB/256GB या दोन स्टोरेज मॉडेलसह येतील. तसेच दोन्ही स्मार्टफोन ब्लॅक, व्हाइट आणि ग्रीन कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येतील. तर Samsung Galaxy S22 Ultra मध्ये 12GB RAM सह 256GB आणि 512GB इंटरनल स्टोरेज मिळू शकते. हा फोन भारतात Phantom Black आणि Phantom White कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध होईल.
हे देखील वाचा:
- Realme नं सादर केला दमदार ‘Speed Edition’ फोन; कमी किंमतीत सुपर फास्ट परफॉर्मन्स
- स्वस्त आणि नवीन iPhone SE (2022) घ्यावा कि त्याच किंमतीत iPhone 12 सीरिजचा मॉडेल निवडावा?
- Amazon TV Sale: अर्ध्या किंमतीत मिळतेय 43-इंचाची Smart TV; फक्त काही दिवस 'ही' भन्नाट ऑफर