Samsung Days Sale : १० हजारांपर्यंत बचतीची संधी; स्मार्टफोनवरही मिळणार कॅशबॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 05:12 PM2021-02-09T17:12:34+5:302021-02-09T17:16:53+5:30
Valentines Week च्या निमित्तानं कंपनीकडून ऑफर
Samsung नं मंगळवारी गॅलेक्सी स्मार्टफोन्स आणि टेबलेटवर मोठी सूट देण्यात येणार असल्याची घोषणा केली. Valentines Week च्या निमित्तानं कंपनीनं Samsung Day Sale चं आयोजन केलं आहे. 9 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारीदरम्यान हा सेल सुरू राहणार आहे. Samsung च्या वेबसाईटवर, ई कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आणि रिटेल आऊटलेवर या ऑफरचा लाभ घेता येईल.
सॅमसंगनं प्रेस रिलिज जारी करत Samsung Days Sale मध्ये मिळणाऱ्या ऑफर्सबद्दल माहिती दिली. या सेलमध्ये गॅलेक्सी नोट 10 लाइट, गॅलेक्सी एस10 लाइट, गॅलेक्सी ए71, गॅलेक्सी ए51, गॅलेक्सी ए31 आणि गॅलेक्सी ए21एस वर मोठी सूट देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त गॅलेक्सी एम51, गॅलेक्सी एम31एस, गॅलेक्सी एम31, गॅलेक्सी एम21, गॅलेक्सी एफ41 आणि गॅलेक्सी एम11 या स्मार्टफोनवरही ऑफर्स देण्यात येत आहे.
या स्मार्टफोन्सवर 10 टक्के बँक कॅशबॅकचाही लाभ मिळणार आहे. सर्व क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शन्सवर हा लाभ घेता येईल. तर दुसरीकडे ICICI बँकेच्या डेबिट कार्डवर सॅमसंगच्या साईटवर आणि ऑफलाईन दुकानांमध्ये आणि कोटक महिंद्रा बँकेच्या कार्डावर ईएमआयद्वारे फोन घेतल्यानंतरही १० टक्क्यांचं कॅशबॅक मिळेल.
4K डिस्प्ले असलेला Xiaomi Mi TV Q1 लाँच; डॉल्बी ऑडियोसह मिळणार अनेक फीचर्स
Samsung आपल्या गॅलेक्सी टॅबवरही बंपर सूट देत आहे. HFC बँकेच्या डेबिट अथवा क्रेडिट कार्डाच्या मदतीनं फोन खरेदी केल्यास 10 हजारांपर्यंत सूट मिळणार आहे. याव्यतिरिक्त इकोसिस्टम बंडल ऑफर अंतर्गत 10 हजार रूपयांचे अतिरिक्त फायदेही देण्यात येत आहेत. इकोसिस्टम ऑफर अंतर्गत कीबोर्ड कव्हरवर १० हजार रूपये अथवा गॅलेक्सी बड्स+ वर ७ हजार रूपयांची सूट मिळणार आहे.