अबब! 576MP चा कॅमेरा सादर करणार ‘ही’ कंपनी; मानवी डोळ्याशी करणार बरोबरी  

By सिद्धेश जाधव | Published: September 9, 2021 07:32 PM2021-09-09T19:32:45+5:302021-09-09T19:33:35+5:30

Samsung ऑटोमोबाईलसाठी 576MP चा कॅमेरा सेन्सर डेव्हलप करत आहे. पुढील चार वर्षात हा सेन्सर अस्तित्वात येऊ शकतो.  

Samsung to develop 576mp camera sensor in four years | अबब! 576MP चा कॅमेरा सादर करणार ‘ही’ कंपनी; मानवी डोळ्याशी करणार बरोबरी  

अबब! 576MP चा कॅमेरा सादर करणार ‘ही’ कंपनी; मानवी डोळ्याशी करणार बरोबरी  

Next

मेगापिक्सलच्या शर्यतीत Samsung नेहमीच पुढे असते. कंपनीने सर्वात पहिला 108MP कॅमेरा सेन्सर सादर केला होता. काही दिवसांपूर्वी दक्षिण कोरियन कंपनीने 200MP च्या सेन्सरची घोषणा केली होती. आता पुन्हा एकदा कॅमेरा टेक्नॉलॉजी क्षेत्रात इतिहास घडवण्यासाठी टेक दिग्गज कंपनी तयारी करत असल्याचे दिसत आहे. सॅमसंग सध्या 576 मेगापिक्सलच्या कॅमेरा सेन्सरवर काम करत आहे, अशी बातमी आली आहे. हा सेन्सर पुढील चार वर्षात बाजारात येऊ शकतो. विशेष म्हणजे मानवी डोळ्याचे रिजोल्यूशन देखील 576MP आहे.  

Gizmochina च्या रिपोर्टनुसार, SEMI युरोप समिटमध्ये एका प्रेजेंटेशनमधून Samsung Electronics चे SVP आणि ऑटोमोटिव सेन्सरचे प्रमुख हेचांग ली यांनी कंपनीच्या प्रकल्पांची माहिती दिली. या दरम्यान त्यांनी कंपनी 2025 मध्ये आपला 576-मेगापिक्सल कॅमेरा सेन्सर लाँच करणार असल्याचा खुलासा केला आहे. हा 576MP कॅमेरा सेन्सर स्मार्टफोनमध्ये येणार नाही तर कंपनी सेन्सर ऑटोमोबाईलसाठी विकसित करत आहे. या सेन्सरचा वापर ड्रोन आणि मेडीकल डिवाइसेजमध्ये देखील केला केला जाऊ शकतो. 

Samsung ISOCELL HP1 200MP कॅमेरा सेन्सर  

Samsung ने नवीन 200MP ISOCELL HP1 कॅमेरा सेन्सर 0.64μm पिक्सलसह सादर केला आहे. हा सेन्सर खूप डिटेल्स कॅप्चर करू शकतो, असा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे तुम्ही काढलेला फोटो क्रॉप केल्यावर देखील तितकाच स्पष्ट दिसेल. यात सॅमसंगच्या पिक्सल बाइनिंग टेक्नॉलॉजी ‘ChameleonCell’ चा वापर करण्यात आला आहे.   

हा सेन्सर लो लाइट कंडिशनमध्ये मोठ्या 2.56μm पिक्सलच्या मदतीने 12.5MP रिजोल्यूशनचे आउटपुट देऊ शकतो. नवीन 2.56μm पिक्सल जास्त लाइट कॅप्चर करून इंडोर आणि लो लाइट कंडीशनमध्ये चांगल्या आणि ब्राईट इमेजेस क्लिक करतो. या नवीन 200MP HP1 सेन्सरचा वापर करून 30fps वर 8K व्हिडीओ देखील रेकॉर्ड करता येईल. आगामी Galaxy S22 series मध्ये सॅमसंगचा हा नवीन सेन्सर दिसू शकतो. तसेच शाओमी देखील सॅमसंगकडून हा सेन्सर आपल्या आगामी फ्लॅगशिपसाठी घेऊ शकते.   

Web Title: Samsung to develop 576mp camera sensor in four years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :samsungसॅमसंग