Samsung ची जबरदस्त ऑफर, अवघ्या ४४ रुपयांच्या EMI मध्ये खरेदी करा 5G फोन; जाणून घ्या डील...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 11:09 AM2023-01-27T11:09:18+5:302023-01-27T11:09:46+5:30
Samsung EMI Offer: सॅमसंग कंपनीनं नुकतेच दोन नवे 5G स्मार्टफोन लॉन्च केले. Samsung Galaxy A14 5G आणि Galaxy A23 5G हे दोन फोन तुम्ही ऑनलाइन खरेदी करू शकता.
Samsung EMI Offer: सॅमसंग कंपनीनं नुकतेच दोन नवे 5G स्मार्टफोन लॉन्च केले. Samsung Galaxy A14 5G आणि Galaxy A23 5G हे दोन फोन तुम्ही ऑनलाइन खरेदी करू शकता. तसंच हे फोन ऑफलाइन तर उपलब्ध आहेतच. सध्या या दोन्ही फोन्सवर जबरदस्त ऑफर कंपनी देत आहे. तुम्ही हे दोन्ही फोन अगदी कमी किमतीत विकत घेऊ शकणार आहात. कंपनीनं Finance+ योजनेची घोषणा केली आहे. याअंतर्गत तुम्ही स्मार्टफोन परवडणाऱ्या EMI पर्यायात विकत घेऊ शकता.
सॅमसंग इंडियाचे सीनिअर डायरेक्टर आणि हेड ऑफ मार्केटिंग आदित्य बब्बर यांनी या योजनेबाबत माहिती दिली आहे. Samsung Galaxy A14 फोन यूझर्स सध्या १४,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकतात. ग्राहक हा 5G फोन आता प्रतिदिन ४४ रुपये किंवा १३२० रुपयांच्या मासिक EMI वर खरेदी करू शकतात, अशी माहिती बब्बर यांनी दिली. या फोनची लॉन्चवेळीची किंमत १६,४९९ रुपये इतकी होती. पण सध्या फोनवर १५०० रुपयांचा डिस्काऊंट ऑफर केला आहे. ग्रँड रिपब्लिक डे ऑफर अंतर्गत सॅमसंगच्या या फोनवर १५०० रुपयांचा इन्स्टंग कॅशबॅक ऑफर केला आहे.
दुसरीकडे Galaxy A23 5G फोन तुम्ही १९,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकणार आहात. यावर २ हजार रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक देण्यात येत आहे. तसंच १ हजार रुपयांचा डिस्काऊंट Shop App Welcome वाउचरच्या माध्यमातून मिळत आहे. तसंच हा फोनही तुम्ही EMI वर खरेदी करू शकता.
फोनची वैशिष्ट्य कोणती?
Galaxy A14 5G तीन कॉन्फिग्रेशनमध्ये उपलब्ध आहे. तसंच तीन रंगात उपलब्ध आहे. यात ६.६ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह उपलब्ध आहे. यात 50MP+2MP+2MP चा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. यात 8GB RAM आणि 128GB पर्यंत स्टोरेज पर्याय उपलब्ध आहे. फोनचा स्टोरेजला मायक्रो एसडी कार्डच्या सहाय्यानं वाढता येऊ शकतं.