Samsung ची अनोखी Frame TV भारतात लाँच; घराची शोभा वाढवण्याचे काम करेल 4K QLED डिस्प्ले
By सिद्धेश जाधव | Published: June 9, 2021 02:35 PM2021-06-09T14:35:01+5:302021-06-09T14:37:32+5:30
Samsung The Frame Tv: चार साईजेसमध्ये Samsung The Frame Tv फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि सॅमसंगच्या वेबसाईटवरून विकत घेता येईल.
सॅमसंगने सर्वात स्टाइलिश आणि लोकप्रिय टीव्ही द फ्रेमचा 2021 मॉडेल भारतात लाँच केला आहे. द फ्रेम एक अशी टीव्ही आहे जी चालू झाल्यावर टेलिव्हिजनचे काम करते आणि बंद झाल्यावर या टीव्हीचा वापर एखाद्या फ्रेम केलेल्या कलाकृतीप्रमाणे करता येतो. या टीव्हीच्या नावावरूनच तुम्हाला याचा अंदाज आलाच असेल. या टीव्हीच्या आकाराची सुरुवात 43 इंचापासून करण्यात आली आहे. यात देण्यात आलेल्या 1,400 पेक्षा जास्त कलाकृती किंवा तुमच्या आवडीचा फोटो देखील तुम्ही फ्रेम करून ठेऊ शकता.
द फ्रेमची नवीन आवृत्ती जुन्या मॉडेलच्या तुलनेत 46 टक्के पातळ आहे. यात क्यूलेड (QLED) स्क्रीन देण्यात आली आहे. द फ्रेम 2021 मध्ये सॅमसंग क्वांटम डॉट टेक्नॉलॉजी, दमदार क्वांटम प्रोसेसर 4K, 4K एआय अपस्केलिंग आणि स्पेसफिट साउंड असे फिचर देण्यात आले आहेत.
द फ्रेम 2021 12 जूनपासून अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि सॅमसंगच्या अधिकृत ऑनलाइन स्टोरवरून विकत घेता येईल. या टीव्हीच्या सर्वात छोट्या मॉडेलची किंमत 61,990 रुपये आहे. द फ्रेम टीव्ही 43-इंच, 50-इंच, 55-इंच आणि 65-इंच अश्या चार वेगवेगळ्या आकारांमध्ये विकत घेता येईल. 12 जून ते 21 जून दरम्यान द फ्रेम विकत घेतल्यास 9,900 रुपयांचे बेजल मोफत मिळतील.