लाँच झाला Samsung चा स्वस्त स्मार्टफोन; 5000mAh बॅटरीसह आला Galaxy A03 Core
By सिद्धेश जाधव | Published: December 6, 2021 07:18 PM2021-12-06T19:18:44+5:302021-12-06T19:19:01+5:30
Samsung Galaxy A03 Core Price In India: Samsung Galaxy A03 Core स्मार्टफोन भारतात UNISOC प्रोसेसर, 2GB RAM, 32GB Storage आणि 5000mAh च्या बॅटरीसह सादर करण्यात आला आहे.
Samsung च्या स्वस्त स्मार्टफोनच्या बातम्या गेले कित्येक दिवस येत होत्या. आज अखेरीस Samsung Galaxy A03 Core स्मार्टफोन भारतीय बाजारात अधिकृतपणे लाँच केला गेला आहे. या फोनमध्ये UNISOC प्रोसेसर, 2GB RAM, 32GB Storage आणि 5000mAh ची बॅटरी असे फीचर्स मिळतात. चला जाणून घेऊया या 4G Phone ची सविस्तर माहिती.
Samsung Galaxy A03 Core ची किंमत
Samsung Galaxy A03 Core स्मार्टफोनचा एकमेव व्हेरिएंट भारतात आला आहे. ज्यात 2GB RAM आणि 32GB स्टोरेज मिळते. या फोनची किंमत 7,999 रुपये ठेवण्यात आली आहे, कंपनीनं डिवाइसचे ब्लॅक आणि ब्लू असे दोन कलर व्हेरिएंट देखील सादर केले आहेत.
Samsung Galaxy A03 Core चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy A03 Core स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा दिसले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले कंपनीनं इन्फिनिटी-व्ही डिजाईन आणि एचडी+ रिजोल्यूशनसह सादर केला आहे. सॅमसंगचा हा फोन ऑक्टा कोर प्रोसेसरसह बाजारात आला आहे, सोबत UNISOC चिपसेट मिळतो. त्याचबरोबर 2GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज मिळते. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी Galaxy A03 Core स्मार्टफोनमध्ये सिंगल रियर कॅमेरा मिळतो, ज्याचे रिजोल्यूशन 8MP आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी कंपनींत फोनमध्ये 5MP चा फ्रंट कॅमेरा सेन्सर दिला आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. या ड्युअल सिम 4G फोनमध्ये बेसिक कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स मिळतात.