अत्यंत स्वस्तात Samsung स्मार्टफोनची एंट्री; 1TB स्टोरेज सपोर्टसह चीनी कंपन्यांची उडवणार झोप 

By सिद्धेश जाधव | Published: February 25, 2022 04:53 PM2022-02-25T16:53:27+5:302022-02-25T16:53:49+5:30

Samsung Galaxy A03 Price In India: Samsung Galaxy A03 स्मार्टफोन 48MP Camera, 4GB RAM आणि 5000mAh बॅटरीसह लाँच झाला आहे.

Samsung Galaxy A03 launched in india with 48mp camera phone know price specifications sale offer  | अत्यंत स्वस्तात Samsung स्मार्टफोनची एंट्री; 1TB स्टोरेज सपोर्टसह चीनी कंपन्यांची उडवणार झोप 

अत्यंत स्वस्तात Samsung स्मार्टफोनची एंट्री; 1TB स्टोरेज सपोर्टसह चीनी कंपन्यांची उडवणार झोप 

Next

Samsung नं भारतात चिनी कंपन्यांना टक्कर देण्याची तयारी केली आहे. आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत लो बजेट स्मार्टफोन सादर केला आहे. हा हँडसेट गॅलेक्सी ‘ए’ सीरीजमध्ये Samsung Galaxy A03 नावानं आला आहे. सॅमसंगनं हा मोबाईल फक्त 10,499 रुपयांच्या आरंभिक किंमतीत आला आहे.  

Samsung Galaxy A03 चे स्पेसिफिकेशन्स 

Samsung Galaxy A03 स्मार्टफोनमध्ये 6.5-इंच का HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक वॉटरड्रॉप नॉच डिजाईन असलेला डिस्प्ले आहे. या फोनला ऑक्टा कोर प्रोसेसरची ताकद देण्यात आली आहे. फोनमधील चिपसेटची माहिती मात्र मिळाली नाही. Galaxy A03 चे दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंट सादर करण्यात आले आहेत. ज्यात 3GB/32GB आणि 4GB/64GB चा समावेश आहे. ही स्टोरेज 1TB पर्यंत मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येईल.  

Samsung Galaxy A03 च्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 48MP चा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आणि 2MP ची डेप्थ ऑफ फील्ड लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. पॉवर बॅकअपसाठी या सॅमसंगच्या फोनमध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. 

Samsung Galaxy A03 प्राईस व सेल 

सॅमसंग गॅलेक्सी ए03 च्या 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 10,499 रुपये आहे. तसेच 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी 11,999 रुपये मोजावे लागतील. या फोनचे Black, Red आणि Blue कलर व्हेरिएंट आले आहेत.  

हे देखील वाचा:

Web Title: Samsung Galaxy A03 launched in india with 48mp camera phone know price specifications sale offer 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.