एंट्री लेव्हल Samsung Galaxy A03 Core स्मार्टफोन लाँच होण्याआधीच वेबसाईटवर लिस्ट; जाणून घ्या वैशिष्ट्ये
By सिद्धेश जाधव | Published: November 16, 2021 08:24 PM2021-11-16T20:24:15+5:302021-11-16T20:25:18+5:30
Samsung Galaxy A03 Core Price And Details: Samsung Galaxy A03 Core स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोर प्रोसेसर, 2GB RAM आणि 5,000mAh ची बॅटरी देण्यात येईल.
सॅमसंगचा आगामी स्मार्टफोन Samsung Galaxy A03 Core कंपनीच्या वेबसाईटवर लिस्ट करण्यात आला आहे. हा एक एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे जो लवकरच ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोर प्रोसेसर, 2GB RAM आणि 5,000mAh ची बॅटरी देण्यात येईल. चला जाणून घेऊया Samsung Galaxy A03 Core स्मार्टफोनची सविस्तर माहिती.
Samsung Galaxy A03 Core चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy A03 Core मध्ये 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले मिळेल. प्रोसेसिंगसाठी कंपनी यात ऑक्टा कोर प्रोसेसर देणार आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 2GB RAM आणि 32GB इंटरनल स्टोरेज देण्यात येईल. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने वाढवता येईल. हा फोन अँड्रॉइडच्या फुल फ्लेज ऑपरेटिंग सिस्टमसह येईल कि नाही मात्र अजून स्पष्ट झाले नाही.
कनेक्टिविटीसाठी या ड्युअल-SIM फोनमध्ये 4G LTE मिळेल. तसेच लिस्टिंगनुसार यात अॅक्सेलेरोमीटर, लाईट सेन्सर आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर मिळेल. Galaxy A03 स्मार्टफोनमध्ये 8MP चा रियर कॅमेरा मिळेल. या फोनच्या फ्रंटला 5MP चा कॅमेरा सेन्सर मिळेल. सॅमसंगच्या या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी मिळेल.
Samsung Galaxy A03 Core ची किंमत
Samsung Galaxy A03 Core स्मार्टफोनची किंमत मात्र वेबसाईटवर लिस्ट झाली नाही. हा फोन ब्लॅक आणि ब्लू कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. याआधी आलेल्या Samsung Galaxy A2 Core ची किंमत पाहता हा आगामी फोन 7000 रुपयांच्या आत सादर केला जाऊ शकतो.