मामुली किंमतीत 5,000mAh बॅटरी असलेला Samsung चा फोन; झक्कास फोटो काढण्यासाठी 48MP कॅमेरा
By सिद्धेश जाधव | Published: February 12, 2022 05:19 PM2022-02-12T17:19:03+5:302022-02-12T17:23:11+5:30
Samsung Galaxy A03 India Launch: Samsung Galaxy A03 स्मार्टफोन 5000mAh बॅटरी, 48MP कॅमेरा आणि 4GB रॅमसह भारतात लाँच केला जाईल.
Samsung भारतात एक नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन सादर करणार आहे. हा फोन कंपनीच्या गॅलेक्सी ए-सीरीज मध्ये सादर केला जाईल. कंपनीनं जरी याची अधिकृत घोषणा केली नसली तरी 91mobiles नं टिपस्टर मुकुल शर्माच्या हवाल्याने Samsung Galaxy A03 च्या भारतीय लाँचची माहिती दिली. या रिपोर्टनुसार, हा डिवाइस या महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा मार्चच्या सुरुवातीला सादर केला जाईल.
Samsung Galaxy A03 याआधी आंतराष्ट्रीय बाजारात लाँच झाला आहे. त्यामुळे या स्मार्टफोनच्या स्पेक्सची माहिती उपलब्ध आहे. तसेच रिपोर्टमध्ये या हँडसेटच्या संभाव्य किंमतीचा उल्लेख करण्यात आला आहे. भारतात सॅमसंग गॅलेक्सी ए03 ची किंमत सुमारे 12,000 रुपये असेल, असा दावा टिपस्टरनं केला आहे.
Samsung Galaxy A03 चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy A03 स्मार्टफोनमध्ये 6.5-इंच का HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक वॉटरड्रॉप नॉच डिजाईन असलेला डिस्प्ले आहे. या फोनला ऑक्टा कोर प्रोसेसरची ताकद देण्यात आली आहे. फोनमधील चिपसेटची माहिती मात्र मिळाली नाही. Galaxy A03 चे दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंट सादर करण्यात आले आहेत. ज्यात 3GB/32GB आणि 4GB/64GB चा समावेश आहे.
Samsung Galaxy A03 च्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 48MP चा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आणि 2MP ची डेप्थ ऑफ फील्ड लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. पॉवर बॅकअपसाठी या सॅमसंगच्या फोनमध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.
हे देखील वाचा:
- Flipkart Sale: जुना फोन द्या आणि फक्त 200 रुपयांमध्ये मिळवा नवीन 5G Smartphone, सोडू नका ही शानदार डील
- 15 हजारांच्या आत येणाऱ्या ‘हे’ Realme स्मार्टफोन मिळतायत स्वस्तात; 6000mAh बॅटरी, 8GB रॅमवरही आहे डिस्काउंट