सॅमसंगचा स्वस्त स्मार्टफोन भारतीय वेबसाईटवर लिस्ट; Samsung Galaxy A03s होऊ शकतो लवकरच लाँच 

By सिद्धेश जाधव | Published: July 3, 2021 11:42 AM2021-07-03T11:42:35+5:302021-07-03T11:44:25+5:30

Samsung Galaxy A03s BIS: Samsung Galaxy A03s इंडियन सर्टिफिकेशन साइट BIS वर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगमुळे हा स्मार्टफोन लवकरच लाँच केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. 

Samsung galaxy a03s bis listing india launch soon  | सॅमसंगचा स्वस्त स्मार्टफोन भारतीय वेबसाईटवर लिस्ट; Samsung Galaxy A03s होऊ शकतो लवकरच लाँच 

हा फोटो  Samsung Galaxy A02s चा आहे.

Next

सॅमसंगचा लो बजेट स्मार्टफोन Samsung Galaxy A03s लवकरच भारतात लाँच केला जाऊ शकतो. काही दिवसांपूर्वी हा स्मार्टफोन Bluetooth SIG या सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट झाला होता. आता Samsung Galaxy A03s इंडियन सर्टिफिकेशन साइट BIS वर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगमुळे हा स्मार्टफोन लवकरच लाँच केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे.  (Samsung Galaxy A03s India launch looks imminent following BIS certification)

ब्यूरो आफ इंडियन स्टॅंडर्ड म्हणजे BIS ही इंडियन सर्टिफिकेशन साईट आहे. MySmartPrice ने सर्वप्रथम BIS वरील Samsung Galaxy A03s च्या लिस्टिंगची माहिती दिली आहे. सर्टिफिकेशसन वेबसाईटवर सॅमसंगचा गॅलेक्सी ए03एस SM-A037F या मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. लवकरच हा स्मार्टफोन भारतात लाँच केला जाणार आहे, हे या लिस्टिंगवरून स्पष्ट होते.  

Samsung Galaxy A03s चे स्पेसिफिकेशन्स 

सॅमसंगने Samsung Galaxy A03s संबंधित कोणतीही माहिती अधिकृतपणे सांगितलेली नाही. परंतु अनेक लिक्समधून या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. त्यानुसार, या फोनमध्ये 6.5 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात येईल. या फोनमध्ये व्ही शेप नॉच मिळू शकते. या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB पर्यंतची स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे. Android 11 आधारित या एंट्री लेव्हल स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 450 प्रोसेसर मिळू शकतो.  

फोटोग्राफीसाठी फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर मिळू शकतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात येईल. पावर बॅकअपसाठी Samsung Galaxy A03s मध्ये 15वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000एमएएचची बॅटरी मिळू शकते. हा बजेट फोन 10,000 रुपयांच्या आसपास उपलब्ध होऊ शकतो.  

Web Title: Samsung galaxy a03s bis listing india launch soon 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.