स्मार्टफोन्स महागले! Xiaomi आणि OPPO नंतर Samsung ने लो बजेट स्मार्टफोन्सच्या वाढवल्या किंमती 

By सिद्धेश जाधव | Published: July 9, 2021 12:20 PM2021-07-09T12:20:27+5:302021-07-09T12:21:25+5:30

Samsung Smartphone Price: Samsung Galaxy A12, Galaxy M02s आणि Galaxy F02s स्मार्टफोन्सची किंमत 500 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. 

Samsung galaxy a12 galaxy m02s and galaxy f02s price hike in india after xiaomi oppo  | स्मार्टफोन्स महागले! Xiaomi आणि OPPO नंतर Samsung ने लो बजेट स्मार्टफोन्सच्या वाढवल्या किंमती 

Samsung Galaxy F02s चा 3GB आणि 32GB स्टोरेज व्हेरिएंट आता 8,999 रुपयांच्या ऐवजी 9,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Next

जीएसटीचे दर वाढल्यामुळे एप्रिलपासून Xiaomi, Realme आणि OPPO सह अनेक ब्रॅंड्सनी आपल्या मिड-रेंज बजेट स्मार्टफोनच्या किंमती वाढवण्यास सुरुवात केली होती. परंतु गेल्या आठवड्यापासून अनेक कंपन्यांनी फोन्सच्या किंमती वाढवल्या आहेत. शाओमी आणि ओप्पोच्या पाउलांवर पाउल टाकत टेक दिग्गज Samsung ने आपल्या तीन फोन्सची किंमत वाढवली आहे. Samsung Galaxy A12, Galaxy M02s आणि Galaxy F02s स्मार्टफोन्सची किंमत 500 रुपयांनी वाढवण्यात आली आहे.  (samsung has increased the prices of these A F and M series smartphones in India)

नवीन किंमती  

Samsung Galaxy F02s चा 3GB आणि 32GB स्टोरेज व्हेरिएंट आता 8,999 रुपयांच्या ऐवजी 9,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट 10,499 रुपयांमध्ये उपलब्ध होईल, जो 9,999 रुपयांमध्ये लाँच केला गेला होता. 

Samsung Galaxy M02s कंपनीने दोन रॅम व स्टोरेज व्हेरिएंटमध्ये भारतात लाँच केला होता. या डिवाइसचा 3GB आणि 32GB स्टोरेज व्हेरिएंट आता 9,499 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. लाँचच्या वेळी या फोनची किंमत 8,999 रुपये होती. तसेच डिवाइसचा 9,999 रुपयांमध्ये लाँच झालेला 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट 10,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Samsung Galaxy A12 चा 4GB रॅम व 64GB स्टोरेज व्हेरिएंट 12,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला होता. परंतु, आता हा फोन 13,499 रुपयांमध्ये खरेदी करावा लागेल. तसेच 13,999 रुपयांमध्ये लाँच झालेल्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 500 रुपयांनी वाढवून  14,499 रुपये करण्यात आली आहे.  

Web Title: Samsung galaxy a12 galaxy m02s and galaxy f02s price hike in india after xiaomi oppo 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.