नव्या अवतारात Samsung Galaxy A12 भारतात लाँच; किंमत फक्त 14 हजार रुपये
By सिद्धेश जाधव | Published: August 12, 2021 05:24 PM2021-08-12T17:24:17+5:302021-08-12T17:25:34+5:30
Galaxy A12 Exynos: नव्या Galaxy A12 मध्ये कंपनीने स्वतःचा Exynos चिपसेट दिला आहे, तर दुसरीकडे या स्मार्टफोनच्या जुन्या व्हर्जनमध्ये MediaTek Helio P35 चिपसेट देण्यात आला होता.
अलीकडेच बातमी आली होती कि सॅमसंगने आपला मिडरेंज स्मार्टफोन Galaxy A12 Nacho रशियात सादर केला आहे. आता हाच स्मार्टफोन कंपनीने भारतात Samsung Galaxy A12 म्हणून लाँच केला आहे. याआधी भारतात लाँच झालेल्या Galaxy A12 स्मार्टफोन आणि हा या नव्या स्मार्टफोनमध्ये फरक फक्त प्रोसेसरचा आहे. नव्या Galaxy A12 मध्ये कंपनीने स्वतःचा Exynos चिपसेट दिला आहे, तर दुसरीकडे या स्मार्टफोनच्या जुन्या व्हर्जनमध्ये MediaTek Helio P35 चिपसेट देण्यात आला होता.
नव्या Samsung Galaxy A12 स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स
Galaxy A12 मध्ये कंपनीने 6.5-इंचाचा एचडी+ टीएफटी डिस्प्ले दिला आहे. हा ‘व्ही’ नॉच असलेला डिस्प्ले 720×1600 पिक्सल रिजोल्यूशन आणि 20:9 अस्पेक्ट रेशयोसह सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Exynos 850 चिपसेटसह बाजारात सादर केला गेला आहे. या फोनमध्ये 6GB पर्यंतचा रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज 512जीबी पर्यंत एक्सपांडेबल आहे. हा सॅमसंग फोन Android 11 वर आधारित One UI वर चालतो.
Galaxy A12 Nocho स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यात 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलच्या डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. या फोनमध्ये 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Samsung Galaxy A12 मध्ये पावर बॅकअपसाठी 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
Samsung Galaxy A12 Exynos व्हर्जनची किंमत
Galaxy A12 स्मार्टफोनचा Exynos 850 मॉडेल भारतात दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला गेला आहे. या फोनचा 4GB रॅम + 64GB स्टोरेज व्हेरिएंट 13,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 16,499 रुपये ठेवण्यात आली आहे.