कायमस्वरूपी कपात! स्वस्त Samsung Galaxy A12 स्मार्टफोन झाला अजून स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
By सिद्धेश जाधव | Published: January 3, 2022 01:19 PM2022-01-03T13:19:13+5:302022-01-03T13:19:24+5:30
Samsung Galaxy A12: Samsung Galaxy A12 स्मार्टफोनची किंमत कायमस्वरूपी करण्यात आली आहे. आगामी 5G Phones लक्षात ठेऊन कंपनीनं हा निर्णय घेतला असावा.
Samsung भारतात दोन नवीन 5G Phones सादर करणार असल्याची बातमी आली होती. हे फोन्स कंपनीच्या ए सीरिजमध्ये Galaxy A13 5G आणि Galaxy A33 5G नावानं सादर केले जातील. आता कंपनीनं या फोन्ससाठी जागा करण्यासाठी आपल्या जुन्या Samsung Galaxy A12 स्मार्टफोनची किंमत कायमस्वरूपी कमी केली आहे. कंपनीनं फोनच्या दोन्ही व्हेरिएंटची किंमत 1,000 रुपयांनी कमी केली आहे, अशी माहिती 91mobiles नं दिली आहे.
Samsung Galaxy A12 ची नवीन किंमत
Samsung Galaxy A12 स्मार्टफोनचे दोन्ही व्हेरिएंट 1000 रुपये कमी देऊन खरेदी करता येतील. त्यामुळे फोनचा 4GB RAM आणि 64GB स्टोरेज असलेला मॉडेल 13,999 रुपयांच्या ऐवजी 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येतील. तर 6GB RAM आणि 128GB व्हेरिएंटसाठी 15,499 रुपये मोजावे लागतील.
Samsung Galaxy A12 स्पेसिफिकेशन्स
Galaxy A12 मध्ये कंपनीने 6.5-इंचाचा एचडी+ टीएफटी डिस्प्ले दिला आहे. हा ‘व्ही’ नॉच असलेला डिस्प्ले 720×1600 पिक्सल रिजोल्यूशन आणि 20:9 अस्पेक्ट रेशयोसह सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Exynos 850 चिपसेटसह बाजारात सादर केला गेला आहे. या फोनमध्ये 6GB पर्यंतचा रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज 512जीबी पर्यंत एक्सपांडेबल आहे. हा सॅमसंग फोन Android 11 वर आधारित One UI वर चालतो.
Galaxy A12 स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यात 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलच्या डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. या फोनमध्ये 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Samsung Galaxy A12 मध्ये पावर बॅकअपसाठी 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
हे देखील वाचा:
OMG! फक्त 7.5 हजारांत दमदार LED TV; नवीन वर्षात Flipkart देतंय बंपर डिस्काउंट