लो बजेट Samsung Galaxy A12s ची किंमत लीक; जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
By सिद्धेश जाधव | Published: July 17, 2021 06:45 PM2021-07-17T18:45:30+5:302021-07-17T18:46:11+5:30
Samsung Galaxy A12s Price: Samsung Galaxy A12s गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये लाँच झालेल्या गॅलेक्सी ए12 चा उत्तराधिकारी असेल. या फोनमध्ये एक्सनॉस 850 चिपसेट दिला जाऊ शकतो.
सॅमसंग लवकरच Samsung Galaxy A12s स्मार्टफोन बाजारात सादर करू शकते. हा स्मार्टफोन गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये लाँच झालेल्या गॅलेक्सी ए12 चा उत्तराधिकारी असेल. या फोनमध्ये एक्सनॉस 850 चिपसेट दिला जाऊ शकतो, अशी माहिती लीक रिपोर्ट्समधून समोर आली आहे. आता टिप्सटर सुधांशु अंभोरेने सॅमसंग गॅलेक्सी ए12एस च्या प्रमुख स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.
Samsung Galaxy A12s चे संभाव्य स्पेसिफिकेशन
सुधांशुने दिलेल्या माहितीनुसार, हा फोन 6.5-इंचाच्या आयपीएस एचडी+ पॅनल वाटरड्रॉप-स्टाइल नॉचसह देण्यात येईल. या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. या सॅमसंग फोनमध्ये 4GB रॅम मिळेल तसेच यात 128GB पर्यंतची स्टोरेज दिली जाऊ शकते. हा फोन अँड्रॉइड 11 ओएसवर चालेल.
Samsung Galaxy A12s
— Sudhanshu Ambhore (@Sudhanshu1414) July 15, 2021
-Exynos 850
-Black, White, Blue
-Android 11
-All other specs will remain similar to Galaxy A12
-4GB+64GB: €180
-4GB+128GB: €200 pic.twitter.com/mbB1hJDmaR
Samsung Galaxy A12s मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. या कॅमेरा सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर असेल. सोबत 8 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाईड-अँगल लेन्स, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळू शकतो. पावर बॅकअपसाठी स्मार्टफोन 5,000mAh ची बॅटरी मिळू शकते, ही बॅटरी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. Samsung Galaxy A12s ब्लॅक, व्हाइट आणि ब्लू अश्या तीन रंगात बाजारात दाखल होऊ शकतो.
Samsung Galaxy A12s ची किंमत
Samsung Galaxy A12s दोन व्हेरिएंटमध्ये बाजारात येऊ शकतो. या फोनच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत €180 (अंदाजे 15,500 रुपये) असेल, तर फोनचा 128GB स्टोरेज व्हेरिएंट €200 (अंदाजे 17,500 रुपये) मध्ये विकत घेता येईल.