Samsung करणार कमाल! बजेट सेगमेंट Galaxy A13 4G घेणार दमदार एंट्री; स्पेक्स झाले लीक
By सिद्धेश जाधव | Published: February 8, 2022 12:33 PM2022-02-08T12:33:28+5:302022-02-08T12:33:46+5:30
4G Smartphone Samsung Galaxy A13: Samsung Galaxy A13 4G सध्या ब्लूटूथ एसआयजी वेबसाईटवर लिस्ट झाला आहे. इथून या स्मार्टफोनचा लाँच कन्फर्म झाला आहे.
Samsung Galaxy A13 5G चा स्वस्त व्हर्जन लवकरच बाजारात येणार आहे. अमेरिकेत आलेल्या या 5G Smartphone च्या 4G मॉडेलवर कंपनी काम करत आहे. आता Samsung Galaxy A13 4G स्मार्टफोन Bluetooth SIG वर लिस्ट झाला आहे, या लिस्टिंगमुळे लवकरच हा स्मार्टफोन ग्राहकांच्या भेटीला येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच यात ब्लूटूथ 5.0 ची कनेक्टिव्हिटी देण्यात येईल. अन्य स्पेक्स मात्र अजूनही गुलदस्त्यात आहेत.
जुन्या Samsung Galaxy A13 5G चे स्पेसिफिकेशन्स
सॅमसंग गॅलेक्सी ए13 5जी मध्ये कंपनीनं 6.5-इंचाचा एलसीडी डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन आणि 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यातील सॅमसंग वन युआय अँड्रॉइड 11 आधारित आहे. प्रोसेसिंगसाठी फोनमध्ये मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते.
Samsung Galaxy A13 5G च्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅश, 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. या फोनमध्ये 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा आहे. हा डिवाइस बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स, साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. Samsung Galaxy A13 5G मधील 5,000एमएएचची बॅटरी 15वॉट फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आली आहे.
हे देखील वाचा:
हलक्या-फुलक्या अँड्रॉइड ओएससह आला Tecno POP 5S; बजेटमध्ये ड्युअल रियर कमर आणि बरंच काही...
रियलमी सादर करणार सुंदर स्मार्टफोन; स्वस्त Realme C35 साठी फक्त एक आठवडा थांबा