Samsung चा ढासू 5G फोन Galaxy A13 वेबसाईटवर लिस्ट; कमी किंमतीत देणार Dimensity 700 प्रोसेसर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 06:18 PM2021-10-07T18:18:07+5:302021-10-07T18:18:11+5:30
Cheap 5G phone Samsung Galaxy A13 5G: Samsung Galaxy A13 5G बेंचमार्किंग साईट गिकबेंचवर लिस्ट झाल्यामुळे या फोनच्या चिपसेट, रॅम आणि ऑपरेटिंग सिस्टमची माहिती मिळाली आहे.
आजच सॅमसंगच्या मिड रेंज 5G स्मार्टफोन Galaxy A22 5G SC-56B ची बातमी आली होती. कंपनीने हा फोन जपानमध्ये सादर केला आहे. आता सॅमसंगच्या एका बजेट फ्रेंडली 5G फोनची माहिती समोर आली आहे. हा फोन Galaxy A13 नावाने बाजारात उतरवला जाईल. काही दिवसांपूर्वी स्पेसिफिकेशन्स लीक झाल्यानंतर आता हा फोन Geekbench वर लिस्ट करण्यात आला आहे.
सॅमसंग गॅलेक्सी ए13 5जी स्मार्टफोन बेंचमार्किंग साईट गिकबेंचवर SM-A136U मॉडेल नंबरसह दिसला आहे. या लिस्टिंगमध्ये या फोनला सिंगल-कोर टेस्टमध्ये 465 पॉईंट्स आणि मल्टी-कोर टेस्टमध्ये 1,106 पॉईंट्स मिळाले आहेत. तसेच गिकबेंचवरून या फोनच्या चिपसेटचा खुलासा देखील झाला आहे. हा फोन ARM MT6833V म्हणजे MediaTek Dimensity 700 चिपसेटसह बाजारात येईल. तसेच या डिवाइसमध्ये 4GB रॅम आणि अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टम मिळेल.
Samsung Galaxy A13 5G
Samsung Galaxy A13 5G च्या या स्पेक्सची माहिती टेक वेबसाईट गॅलेक्सी क्लबच्या माध्यमातून समोर आली आहे. वेबसाईटने या फोनच्या कॅमेरा, बॅटरीसह मॉडेल नंबरची माहिती रिपोर्टमध्ये दिली आहे. रिपोर्टनुसार हा सॅमसंग फोन SM-A136B मॉडेल नंबरसह सादर केला जाईल. तसेच गॅलेक्सी ए13 5जी फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते.
कॅमेरा सेग्मेंट पाहता, Samsung Galaxy A13 5G मध्ये सॅमसंगच्या ISOCELL JN1 सेन्सरचा वापर केला जाईल. या फोनच्या रियर पॅनलवर किती सेन्सर असतील याची माहिती मिळाली नाही. तसेच या फोनमधील फ्रंट कॅमेरा कोणत्या रिजोल्यूशनसह येईल हे देखील अजून समोर आले नाही. परंतु रिपोर्टनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए13 चा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर 50 मेगापिक्सलचा असेल.