लो बजेटमध्ये 5G Phone सादर करण्याचा Samsung चा प्रयत्न; Galaxy A13 5G पासून होऊ शकते सुरुवात
By सिद्धेश जाधव | Published: September 23, 2021 12:19 PM2021-09-23T12:19:59+5:302021-09-23T12:21:22+5:30
Cheap 5G Phone Samsung Galaxy A13 5G: Samsung Galaxy A13 5G फोन 50MP कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरीसह सादर केला जाऊ शकतो.
Samsung एका लो बजेट 5G फोनवर काम करत असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. कंपनी हा फोन ‘ए’ सीरिज अंतर्गत सादर करणार असून या फोनचे नाव Samsung Galaxy A13 असे असेल, असे सांगण्यात आले होते. आता या फोनचे काही स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. रिपोर्ट्सनुसार Samsung Galaxy A13 5G फोन 50MP कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरीसह सादर केला जाऊ शकतो.
Samsung Galaxy A13 5G च्या या स्पेक्सची माहिती टेक वेबसाईट गॅलेक्सी क्लबच्या माध्यमातून समोर आली आहे. वेबसाईटने या फोनच्या कॅमेरा, बॅटरीसह मॉडेल नंबरची माहिती रिपोर्टमध्ये दिली आहे. रिपोर्टनुसार हा सॅमसंग फोन SM-A136B मॉडेल नंबरसह सादर केला जाईल. तसेच गॅलेक्सी ए13 5जी फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते.
कॅमेरा सेग्मेंट पाहता, Samsung Galaxy A13 5G मध्ये सॅमसंगच्या ISOCELL JN1 सेन्सरचा वापर केला जाईल. या फोनच्या रियर पॅनलवर किती सेन्सर असतील याची माहिती मिळाली नाही. तसेच या फोनमधील फ्रंट कॅमेरा कोणत्या रिजोल्यूशनसह येईल हे देखील अजून समोर आले नाही. परंतु रिपोर्टनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए13 चा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर 50 मेगापिक्सलचा असेल.
Samsung Galaxy A12 चे स्पेसिफिकेशन्स
Galaxy A12 मध्ये कंपनीने 6.5-इंचाचा एचडी+ टीएफटी डिस्प्ले दिला आहे. हा ‘व्ही’ नॉच असलेला डिस्प्ले 720×1600 पिक्सल रिजोल्यूशन आणि 20:9 अस्पेक्ट रेशयोसह सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Exynos 850 चिपसेटसह बाजारात सादर केला गेला आहे. या फोनमध्ये 6GB पर्यंतचा रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज 512जीबी पर्यंत एक्सपांडेबल आहे. हा सॅमसंग फोन Android 11 वर आधारित One UI वर चालतो.
Galaxy A12 Nocho स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यात 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलच्या डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. या फोनमध्ये 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Samsung Galaxy A12 मध्ये पावर बॅकअपसाठी 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.