सॅमसंगच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज! Galaxy A21s स्मार्टफोनच्या किंमतीत 2500 रुपयांची कपात  

By सिद्धेश जाधव | Published: October 4, 2021 06:04 PM2021-10-04T18:04:53+5:302021-10-04T18:08:07+5:30

Price cut in Samsung Galaxy A21s: कंपनीने Samsung Galaxy A21s च्या दोन्ही व्हेरिएंटची किंमत 2500 रुपयांपर्यंत कमी केली आहे. कंपनीने सणासुदीच्या दिवसांचा विचार करून या स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे.

Samsung galaxy a21s smartphone price cut by rs 2500  | सॅमसंगच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज! Galaxy A21s स्मार्टफोनच्या किंमतीत 2500 रुपयांची कपात  

सॅमसंगच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज! Galaxy A21s स्मार्टफोनच्या किंमतीत 2500 रुपयांची कपात  

Next

सॅमसंगने आपल्या Galaxy A21s स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. कंपनीने सणासुदीच्या दिवसांचा विचार करून या स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे, अशी चर्चा आहे. कंपनीने Samsung Galaxy A21s च्या दोन्ही व्हेरिएंटची किंमत 2500 रुपयांपर्यंत कमी केली आहे.  

Samsung Galaxy A21s ची नवीन किंमत 

Samsung Galaxy A21s स्मार्टफोनचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट आता 13,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटसही 16,490 रुपये मोजावे लागतील. हा ब्लॅक, व्हाइट आणि ब्लू कलर अशा तीन कलर्समध्ये विकत घेता येईल.  

Samsung Galaxy A21s चे स्पेसिफिकेशन्स 

Samsung Galaxy A21s स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाच HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी कंपनीच्या Exynos 850 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. यात 6GB पर्यंत रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. सॅमसंगच्या या फोनची स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1TB पर्यंत वाढवता येते. हा फोन Android 10 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित OneUI 2.0 वर चालतो.  

हा फोन क्वाड रियर कॅमेरा सेटअपसह बाजारात आला आहे. यात 48MP चा मुख्य कॅमेरा, 12MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 2MP चा डेप्थ सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये 13MP चा सेल्फी कॅमेरा आहे. या डिवाइसमधील 5000mAh ची बॅटरी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Web Title: Samsung galaxy a21s smartphone price cut by rs 2500 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.