Samsung चा सर्वात स्वस्त 5G फोन 23 जुलैला येणार भारतात; जाणून घ्या Galaxy A22 ची किंमत
By सिद्धेश जाधव | Published: July 22, 2021 07:35 PM2021-07-22T19:35:03+5:302021-07-22T19:36:01+5:30
Samsung Galaxy A22 5G Launch: सॅमसंग इंडियाने आपल्या ट्विटर हँडलवर एक टीजर शेयर करून सांगितले आहे कि गॅलेक्सी A22 5G भारतात 23 जुलैला लाँच केला जाईल.
Samsung लवकरच भारतातील 5G स्मार्टफोनचा पोर्टफोलिओ वाढवणार आहे. कंपनी भारतात Samsung Galaxy A22 स्मार्टफोनचा 5G मॉडेल करण्याची तयारी करत आहे. कंपनीने Galaxy A22 5G च्या भारतीय लाँचची घोषणा केली नाही, परंतु आता सॅमसंग इंडियाने आपल्या ट्विटर हँडलवर एक टीजर शेयर करून सांगितले आहे कि गॅलेक्सी A22 5G भारतात 23 जुलैला लाँच केला जाईल. (Samsung Galaxy A22 5G will launch on 23 july teased)
Samsung Galaxy A22 5G ची भारतीय किंमत
काही दिवसांपूर्वी Samsung Galaxy A22 5G च्या किंमतीची माहिती समोर आली होती. रिपोर्टनुसार, Samsung Galaxy A22 5G चा 6GB रॅम + 128GB स्टोरेज मॉडेल 19,999 रुपयांमध्ये लाँच केला जाऊ शकतो. तर,फोनच्या 8GB रॅम + 128GB मॉडेलची किंमत 21,999 रुपये ठेवण्यात येईल. हा फोन गेल्या महिन्यात जागतिक बाजारात लाँच करण्यात आला होता, त्यामुळे Samsung Galaxy A22 5G च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती आधीपासूनच उपलब्ध आहे.
Samsung Galaxy A22 5G फोनचे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy A22 5G मध्ये 6.6-इंचाचा फुल एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन MediaTek Dimensity 700 5G SoC सह बाजारात दाखल झाला आहे. या सोबत 8GB पर्यंतचा रॅम 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. हा सॅमसंग फोन अँड्रॉइड 11 आधारित वन युआय 3.0 वर चालतो.
फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A22 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. हा 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी 15 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.