कमी किंमतीत Samsung चा नवीन 5G Phone लाँच; जाणून घ्या खास स्पेसिफिकेशन्स
By सिद्धेश जाधव | Published: October 7, 2021 11:56 AM2021-10-07T11:56:55+5:302021-10-07T11:57:03+5:30
Budget 5G Phone Samsung Galaxy A22 5G SC-56B: सॅमसंगने जपानमध्ये Samsung Galaxy A22 5G SC-56B नावाचा स्मार्टफोन सादर केला आहे. हा एक स्वस्त 5G फोन असू शकतो.
सॅमसंग बाजाराचा कल बघून नवनवीन 5G phone सादर करत आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने गॅलेक्सी ए22 भारतात लाँच केला होता. हा एक मिडरेंज स्मार्टफोन आहे जो देशात 19,999 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे. आता या फोनचा नवीन व्हेरिएंट जपानमध्ये सादर करण्यात आला आहे. सॅमसंगने जपानमध्ये Samsung Galaxy A22 5G SC-56B नावाचा स्मार्टफोन सादर केला आहे.
भारतातील फोनच्या तुलनेत जपानमधील फोन डाउनग्रेड स्पेसिफिकेशन्ससह सादर करण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोन्समधील प्रोसेसर मात्र कंपनीने एकच ठेवला आहे. चला जाणून घेऊया जपानमध्ये लाँच झालेल्या गॅलेक्सी ए22 5जी फोनची खासियत
Samsung Galaxy A22 5G SC-56B
या फोनमध्ये 5.8 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एचडी+ रिजोल्यूशनला सपोर्ट करणारा टीएफअी पॅनल आहे. स्टँडर्ड 60हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्टसह यात टियरड्रॉप नॉच देण्यात आली आहे. हा डिवाइस अँड्रॉइड 11 वर आधारित वनयुआयवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये भारतीय व्हेरिएंट प्रमाणे ऑक्ट-कोर प्रोसेसरसह मीडियाटेकचा डिमेनसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर या फोनमध्ये 4GB RAM आणि 64GB इंटरनल स्टोरेजला मिळते, ही मेमरी मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते.
हा डिवाइस 13 मेगापिक्सलच्या सिंगल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हा फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जपानमध्ये Samsung Galaxy A22 5G SC-56B फोन red, black आणि white रंगात विकत घेता येईल. या फोनची किंमत मात्र अजूनही कंपनीने सांगितलेली नाही.