5,000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा असलेला Samsung Galaxy A22 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत 

By सिद्धेश जाधव | Published: June 30, 2021 07:34 PM2021-06-30T19:34:50+5:302021-06-30T19:35:46+5:30

Samsung Galaxy A22 price in India: Samsung Galaxy A22 फोन Samsung India च्या अधिकृत वेबसाईटवरून विकत घेता येईल.  

Samsung galaxy a22 launch with 48mp primary rear cameras 90hz display in india price rs 18499  | 5,000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा असलेला Samsung Galaxy A22 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत 

Samsung Galaxy A22 मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

googlenewsNext

गेले अनेक दिवस Samsung Galaxy A22 च्या बातम्या येत होत्या. कित्येक दिवस चर्चेत राहिल्यानंतर अखेरीस सॅमसंगने हा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. Samsung Galaxy A22 सॅमसंग इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. या फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप, 90 हर्ट्ज अ‍ॅमोलेड डिस्प्ले आणि यात 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.  

Samsung Galaxy A22 ची किंमत  

Samsung Galaxy A22 स्मार्टफोन भारतात फक्त एकाच व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेजसह येणारा हा स्मार्टफोन सॅमसंग इंडियाच्या वेबसाईटवरून भारतात 18,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Samsung Galaxy A22 चे स्पेसिफिकेशन्स  

Samsung Galaxy A22 मध्ये 6.4 इंचाचा एचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 720 x 1,600 पिक्सल आणि रिफ्रेश रेट 90 हर्ट्ज आहे. फोनमधील प्रोसेसरची माहिती देण्यात आली नाही, परंतु यात ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजला सपोर्ट करणारा हा स्मार्टफोन Android 11 आधारित One UI 3.1 वर चालेल. 

Samsung Galaxy A22 मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळतो. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 13 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. 

सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये एक साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. Galaxy A22 मध्ये एक 5,000 एमएएचची बॅटरी आहे. ही बॅटरी 15 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीने चार्ज करता येईल.  

Web Title: Samsung galaxy a22 launch with 48mp primary rear cameras 90hz display in india price rs 18499 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.