12GB RAM, 64MP कॅमेऱ्यासह सॅमसंगचा भन्नाट स्मार्टफोन आला बाजारात; किंमत देखील बजेटमध्ये
By सिद्धेश जाधव | Published: November 15, 2021 05:28 PM2021-11-15T17:28:38+5:302021-11-15T17:30:01+5:30
Samsung Galaxy A32 Price In India: Samsung Galaxy A32 चा नवीन 8GB RAM व्हेरिएंट RAM Plus या नव्या फिचरसह बाजारात आला आहे.
Samsung Galaxy A32 Price In India: सॅमसंगने मार्चमध्ये भारतात सादर केलेल्या Samsung Galaxy A32 स्मार्टफोनचा नवीन व्हेरिएंट सादर केला आहे. मार्चमध्ये या फोनचा फक्त 6GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट सादर करण्यात आला होता. आता कंपनीने 8GB RAM व्हेरिएंट उतरवला आहे. ज्यात 64MP Quad rear Camera, 20MP Selfie Camera आणि 5,000mAh Battery हे स्पेक्स मात्र बदलले नाहीत. विशेष म्हणजे या व्हेरिएंटमध्ये RAM Plus फिचर देण्यात आले आहे, ज्यामुळे गरजेनुसार 4GB पर्यंत अतिरिक्त रॅम वाढवता येतो आणि त्यामुळे एकूण रॅम 12GB होतो.
Samsung Galaxy A32 ची किंमत
Samsung Galaxy A32 चे दोन व्हेरिएंट आता देशात उपलब्ध झाले आहेत. नव्या 8GB RAM + 128GB Storage व्हर्जनची किंमत 23,499 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 6GB RAM + 128GB Storage साठी 21,999 रुपये मोजावे लागतील.
Samsung Galaxy A32 चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy A32 स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचाचा फुलएचडी+ एसअॅमोलेड डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. हा डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 च्या सुरक्षेसह बाजारात आला आहे. स्मार्टफोन MediaTek Helio G80 SoC आणि Mali-G52 2EEMC2 GPU सह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1 टीबी पर्यंत वाढवता येते.
फोटग्राफीसाठी Galaxy A32 मध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रावाईड अँगल लेन्स, 5 मेगापिक्सलचा डेप्थ आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा असलेला क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा फोन 20 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यातील 5000mAh ची बॅटरी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.