नाचू लागले सॅमसंगचे फॅन्स! वॉटरप्रूफ स्मार्टफोनची किंमत लीक; दमदार बॅटरीसह शानदार कॅमेरा  

By सिद्धेश जाधव | Published: April 4, 2022 07:51 PM2022-04-04T19:51:11+5:302022-04-04T19:51:17+5:30

Samsung Galaxy A33 5G स्मार्टफोन लवकरच भारतात सादर केला जाणार आहे, आता या फोनची किंमत लीक झाली आहे.  

Samsung Galaxy A33 5G Smartphone Indian Price Leaked Check Specifications  | नाचू लागले सॅमसंगचे फॅन्स! वॉटरप्रूफ स्मार्टफोनची किंमत लीक; दमदार बॅटरीसह शानदार कॅमेरा  

नाचू लागले सॅमसंगचे फॅन्स! वॉटरप्रूफ स्मार्टफोनची किंमत लीक; दमदार बॅटरीसह शानदार कॅमेरा  

googlenewsNext

Samsung नं भारतात आपल्या ए सीरिजमध्ये 5 स्मार्टफोन सादर केले आहेत. परंतु या फोन्सच्या किंमतीचा खुलासा कंपनीनं केला नाही. असा एक स्मार्टफोन म्हणजे Galaxy A33 5G, जो 5000mAh बॅटरी, 48MP कॅमेरा, 8GB RAM आणि IP67 रेटिंगसह सादर करण्यात आला आहे. आता Galaxy A33 5G स्मार्टफोनच्या दोन्ही व्हेरिएंटची किंमत समोर आली आहे.  

Samsung Galaxy A33 5G ची भारतीय किंमत 

91moblies ला टिपस्टर सुधांशु अंभोरेनं Samsung Galaxy A33 5G च्या किंमतीची माहिती दिली आहे. त्यानुसार, या स्मार्टफोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल भारतात 28,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या टॉप एन्ड मॉडेलसाठी 29,999 रुपये द्यावे लागतील. ही अधिकृत किंमत नाही परंतु लवकरच कंपनी देखील या स्मार्टफोनच्या किंमतीचा खुलासा करेल.  

Samsung Galaxy A33 5G चे स्पेसिफिकेशन्स 

Samsung Galaxy A33 5G स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचाचा फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा इन्फिनिटी-यु डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसह येतो. कंपनीनं यात 5nm प्रोसेसवर बनलेला Exynos 1280 चिपसेट दिला आहे. सोबत 8GB पर्यंतचा रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळते. जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते. 

फोटोग्राफीसाठी, Samsung Galaxy A33 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशनसह 48MP चा प्रायमरी कॅमेरा आहे. त्याचबरोबर 8MP चा अल्ट्रावाईड सेन्सर, 2MP चा डेप्थ सेन्सर आणि 5MP चा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगची जबाबदारी 13MP चा फ्रंट कॅमेरा पार पडतो. 

हा डिवाइस Android 12 आधारित OneUI 4.1 वर चालतो. यातील IP67 रेटिंग पाणी आणि धुळीपासून फोनचं संरक्षण करते. पावर बॅकअपसाठी या सॅमसंग फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह यात फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा देण्यात आली आहे.  

Web Title: Samsung Galaxy A33 5G Smartphone Indian Price Leaked Check Specifications 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.