Samsung च्या स्मार्टफोनला जोडला iPhone चा पार्ट; प्रथमच अँड्रॉइडमध्ये मिळतंय ‘हे’ फिचर  

By सिद्धेश जाधव | Published: April 4, 2022 04:43 PM2022-04-04T16:43:25+5:302022-04-04T16:46:51+5:30

Ken Pillonel या युट्युबरनं इतिहास घडवला आहे. त्याने अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये आयफोनमधील लाईट्निंग पोर्ट जोडला आहे.  

Samsung Galaxy A51 Becomes Worlds First Android Smartphone To Have Apple iPhones Lightning Port   | Samsung च्या स्मार्टफोनला जोडला iPhone चा पार्ट; प्रथमच अँड्रॉइडमध्ये मिळतंय ‘हे’ फिचर  

Samsung च्या स्मार्टफोनला जोडला iPhone चा पार्ट; प्रथमच अँड्रॉइडमध्ये मिळतंय ‘हे’ फिचर  

Next

काही दिवसांपूर्वी एक बातमी आली होती की, एका इंजिनियरनं अ‍ॅप्पलच्या iPhone 13 मध्ये अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये मिळणारा टाईप-सी पोर्ट जोडला होता. आता त्याच रोबोटिक्स इंजीनियर Ken Pillonel एका अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये अ‍ॅप्पलचा लाईट्निंग पोर्ट जोडला आहे. Pillonel च्या एका टीजर व्हिडीओमधून Samsung Galaxy A51 स्मार्टफोनमधील लाईट्निंग पोर्टची झलक मिळाली आहे.  

लाईट्निंग पोर्ट असलेला हा अँड्रॉइड डिवाइस आयफोनच्या केबलनं चार्ज होतो. इतकेच नव्हे तर या पोर्टच्या मदतीनं डेटा देखील ट्रांसफर करता येतो. सध्या युट्युबरनं फक्त टीजर व्हिडीओ अपलोड केला आहे आणि लवकरच या प्रोजेक्टचा संपूर्ण व्हिडीओ Pillonel च्या युट्युब चॅनेलवर पाहायला मिळेल.  

अँड्रॉइड फोनमध्ये लाईट्निंग पोर्ट 

Ken Pillonel च्या युट्युब चॅनलचं नाव ‘Exploring the Simulation (Kenny Pi)’ असं आहे. इथे केन हार्डवेयरवरील प्रयोगांचे व्हिडीओ पोस्ट करत असतो. याआधी त्याने आयफोनमध्ये टाईप-सी पोर्ट जोडला होता. त्यानंतर अ‍ॅप्पलच्या एयरपॉडमध्ये देखील त्याने टाईप-सी पोर्ट इंटिग्रेट केला होता. हातात अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये जगातील पहिला लाईट्निंग पोर्ट जोडण्याचं काम त्यानं केलं आहे.  

Pillonel नं दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅप्पल लाईटनिंग पोर्ट असलेला हा जगातील पहिला अँड्रॉइड फोन आहे. जो चार्जिंग आणि डेटा ट्रांसफर ही दोन्ही कामं चोख बजावतो. हा प्रयोग सॅमसंग गॅलेक्सी A51 मॉडेलवर करण्यात आला आहे. आयफोनमध्ये अँड्रॉइडचा चार्जिंग पोर्ट जोडल्यानंतर अँड्रॉइडमध्ये आयफोनचा चार्जर जोडून एक चक्र पूर्ण करण्याचा त्याचा उद्देश आहे.  

Web Title: Samsung Galaxy A51 Becomes Worlds First Android Smartphone To Have Apple iPhones Lightning Port  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.