5000 रुपयांनी स्वस्त झाला Samsung चा दणकट 5G स्मार्टफोन; मिळतोय 8GB RAM आणि 64MP कॅमेरा

By सिद्धेश जाधव | Published: April 2, 2022 01:24 PM2022-04-02T13:24:51+5:302022-04-02T13:25:02+5:30

Samsung Galaxy A52s 5G स्मार्टफोनची किंमत 5000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.  

Samsung Galaxy A52s 5G Gets Price Cut Of Rs 5000 In India Check New Rates  | 5000 रुपयांनी स्वस्त झाला Samsung चा दणकट 5G स्मार्टफोन; मिळतोय 8GB RAM आणि 64MP कॅमेरा

5000 रुपयांनी स्वस्त झाला Samsung चा दणकट 5G स्मार्टफोन; मिळतोय 8GB RAM आणि 64MP कॅमेरा

Next

काही दिवसांपूर्वी Samsung नं भारतात 5 स्मार्टफोन्स आपल्या ए सीरिजमध्ये सादर केले आहेत. यात 5G स्मार्टफोन्सचा देखील समावेश आहे. म्हणूनच कदाचित आता गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये आलेल्या Galaxy A52s 5G फोनची किंमत कंपनीनं कमी केली आहे. सॅमसंगनं या शानदार स्मार्टफोनची किंमत 5000 रुपयांनी कमी केली आहे. चला जाणून घेऊया नवीन किंमत.  

Samsung Galaxy A52s 5G ची नवीन किंमत  

Samsung Galaxy A52s 5G चे दोन व्हेरिएंट भारतात उपल्बध आहेत. यातील 6GB रॅम व 128GB स्टोरेज असलेला मॉडेल आता 35,999 रुपयांच्या ऐवजी 30,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 37,999 रुपयांच्या 8GB रॅम व 128GB व्हर्जन आता 32,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. सोबत तुम्हाला बँक ऑफर्स देखील देण्यात येतील.  

Samsung Galaxy A52s 5G चे स्पेसिफिकेशन्स 

Samsung Galaxy A52s 5G स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080×2400 पिक्सल रिजोल्यूशन आणि 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेट आणि एड्रेनो 642एल जीपीयू देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित सॅमसंग वनयुआय 3 वर चालतो.  

सॅमसंगने आपला हा फोन ऑन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह सादर केला आहे. हा फोन IP67 रेटेड आहे, त्यामुळे हा वॉटर व डस्ट प्रूफ बनतो. ड्युअल मोड 5G आणि इतर बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह या फोनमध्ये Samsung Pay, Samsung Knox आणि डॉल्बी एटमॉस सपोर्ट देण्यात आला आहे.  

सॅमसंग गॅलेक्सी ए52एस 5जी स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात 64 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. हा फोन 32 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या सॅमसंग फोनमधील 4,500एमएएचची बॅटरी 25वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Samsung Galaxy A52s 5G फोनचा आकार 159.9 x 75.1 x 8.4एमएम आणि वजन 189 ग्राम आहे. 

Web Title: Samsung Galaxy A52s 5G Gets Price Cut Of Rs 5000 In India Check New Rates 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.