120Hz रिफ्रेश रेट, 64MP कॅमेऱ्यासह Samsung Galaxy A52s 5G लवकरच होणार भारतात लाँच  

By सिद्धेश जाधव | Published: August 24, 2021 02:44 PM2021-08-24T14:44:11+5:302021-08-24T14:44:39+5:30

Samsung Galaxy A52s 5g India:

Samsung Galaxy A52s 5g phone poster image on india retail store  | 120Hz रिफ्रेश रेट, 64MP कॅमेऱ्यासह Samsung Galaxy A52s 5G लवकरच होणार भारतात लाँच  

120Hz रिफ्रेश रेट, 64MP कॅमेऱ्यासह Samsung Galaxy A52s 5G लवकरच होणार भारतात लाँच  

googlenewsNext

Samsung ने सध्या स्मार्टफोन लाँचचा सपाटा सुरु ठेवला आहे. गेले काही दिवस एक तर सॅमसंगस्मार्टफोन सादर होत आहेत किंवा नवीन स्मार्टफोनचे लीक समोर येत आहेत. यातील असाच एक स्मार्टफोन म्हणजे Samsung Galaxy A52s 5G. आता या स्मार्टफोनचे पोस्टर्स रिटेल स्टोर्सवर झळकू लागले आहेत. त्यामुळे या स्मार्टफोनचा भारतीय लाँच नजीक आल्याचे समजते. Samsung Galaxy A52s 5G हा स्मार्टफोन आधी जागतिक बाजारात सादर झाल्यामुळे याच्या स्पेक्सची माहिती उपलब्ध आहे. तसेच रिपोर्ट्सनुसार या स्मार्टफोनची भारतीय किंमत युरोपियन किंमतीही मिळतीजुळती असेल.  

Samsung Galaxy A52s 5G चे स्पेसिफिकेशन्स  

Samsung Galaxy A52s 5G स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080×2400 पिक्सल रिजोल्यूशन आणि 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेट आणि एड्रेनो 642एल जीपीयू देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित सॅमसंग वनयुआय 3 वर चालतो.   

सॅमसंगने आपला हा फोन ऑन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह सादर केला आहे. हा फोन IP67 रेटेड आहे, त्यामुळे हा वॉटर व डस्ट प्रूफ बनतो. ड्युअल मोड 5G आणि इतर बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह या फोनमध्ये Samsung Pay, Samsung Knox आणि डॉल्बी एटमॉस सपोर्ट देण्यात आला आहे.   

सॅमसंग गॅलेक्सी ए52एस 5जी स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात 64 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. हा फोन 32 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या सॅमसंग फोनमधील 4,500एमएएचची बॅटरी 25वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.   

Samsung Galaxy A52s 5G ची किंमत 

सॅमसंग गॅलेक्सी ए52एस 5जी फोन युरोपियन बाजारात दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच केला गेला आहे. या फोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत £410 (जवळपास 41,500 रुपये) आहे. तर 8GB रॅम आणि 256GB व्हेरिएंटची किंमत कंपनीने सांगितलेली नाही.  

Web Title: Samsung Galaxy A52s 5g phone poster image on india retail store 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.