सॅमसंगचा 5G फोन झाला वेबसाईटवर लिस्ट; लाँच होण्याआधीच Galaxy A52s च्या किंमतीचा खुलासा
By सिद्धेश जाधव | Published: August 3, 2021 07:39 PM2021-08-03T19:39:09+5:302021-08-03T19:40:01+5:30
काही दिवसांपूर्वी Samsung Galaxy A52s 5G फोन इंडियन सर्टिफिकेशन्स साइट BIS वर लिस्ट करण्यात आला होता.
सॅमसंग आपल्या नवीन 5G फोन काम करत असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. हा स्मार्टफोन Samsung Galaxy A52s नावाने बाजारात येणार आहे. याआधी या स्मार्टफोनच्या युरोपियन किंमतीचा खुलासा लीकमधून करण्यात आला होता. आता Samsung Galaxy A52s स्मार्टफोन युरोपियन रिटेलरच्या वेबसाइटवर लिस्ट झाला आहे. चार कलर ऑप्शनसह येणारा हा स्मार्टफोन 434.64 युरोमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. भारतीय चलनात या किंमतीचे रूपांतरण करायचे झाले तर ही किंमत 38,400 रुपयांच्या आसपास होईल.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी Samsung Galaxy A52s 5G फोन इंडियन सर्टिफिकेशन्स साइट BIS वर SM-A528B/DS मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला होता. या लिस्टिंगमुळे हा फोन लवकरच भारतात लाँच केला जाऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. सर्वप्रथम युरोपमध्ये Samsung Galaxy A52s स्मार्टफोन लाँच केल्यानंतर कंपनी भारतात हा फोन सादर करू शकते.
Samsung Galaxy A52s 5G चे स्पेसिफिकेशन्स
सॅमसंग गॅलेक्सी ए52एस 5जी फोनच्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंचच्या माध्यमातून समोर आली आहे. गीकबेंचनुसार हा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेट आणि एड्रेनो 642एल जीपीयू सह बाजारात येईल. गीकबेंचवर या फोनचा 8GB रॅम व्हेरिएंट लिस्ट करण्यात आला होता. या फोनमध्ये अँड्रॉइड 11 आधारित OneUI 3.0 असू शकतो. Samsung Galaxy A52s ला गीकबेंचच्या सिंगल-कोर टेस्टमध्ये 770 आणि मल्टी-कोर टेस्टिंग 2804 स्कोर मिळाला आहे.