Samsung Galaxy A53: पाण्यात पडल्यावर देखील चालणार सुस्साट; 8GB रॅम, 64MP कॅमेऱ्यासह येतोय भन्नाट स्मार्टफोन

By सिद्धेश जाधव | Published: February 5, 2022 12:33 PM2022-02-05T12:33:23+5:302022-02-05T12:34:05+5:30

Samsung Galaxy A53 5G Phone: Samsung Galaxy A53 स्मार्टफोन 8GB RAM, 64MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 120hz रिफ्रेश रेट आणि IP67 रेटिंगसह सादर केला जाऊ शकतो.  

Samsung Galaxy A53 5G Phone Design And Specifications Leaked Ahead Of Launch  | Samsung Galaxy A53: पाण्यात पडल्यावर देखील चालणार सुस्साट; 8GB रॅम, 64MP कॅमेऱ्यासह येतोय भन्नाट स्मार्टफोन

Samsung Galaxy A53: पाण्यात पडल्यावर देखील चालणार सुस्साट; 8GB रॅम, 64MP कॅमेऱ्यासह येतोय भन्नाट स्मार्टफोन

googlenewsNext

Samsung लवकरच आपल्या मिड-रेंज Galaxy A सीरीजमध्ये Galaxy A33, A53 स्मार्टफोन लाँच करू शकते. हे फोन्स कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर देखील दिसले आहेत. आता WinFuture नं आगामी Samsung Galaxy A53 5G स्मार्टफोनचे रेंडर शेयर केले आहेत. या फोटोजमधून स्मार्टफोनमधील पंच होल कटआउट आणि क्वॉड रियर कॅमेरा सेटअपची माहिती मिळाली आहे. प्लास्टिक फ्रेमसह येणारा हा स्मार्टफोन Galaxy A52 सारख्या डिजाईनसह येईल.  

Samsung Galaxy A53 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स  

Samsung Galaxy A53 स्मार्टफोन 6.46 इंचाच्या फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह लाँच केला जाईल. हा पंच-होल डिजाइनसह येणारा पॅनल 1080 × 2400 पिक्सल रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित वनयुआय 4.0 वर चालेल. यात कंपनीचा एक्सनॉस 1200 चिपसेट देण्यात येईल. सोबत 8 जीबी रॅम आणि 128 जीबी पर्यंतची स्टोरेज मिळेल. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1 टीबी पर्यंत वाढवता येईल.   

फोटोग्राफीसाठी यात क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचे दोन सेन्सर मिळतील. या आगामी सॅमसंग फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात येईल जी 25वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.  

हा फोन White आणि Blue कलरमध्ये लाँच केला जाऊ शकतो. सॅमसंगच्या या फोनमध्ये Samsung Pay, IP67 रेटिंग आणि Dolby Atmos सपोर्ट मिळू शकतो. सिक्योरिटीसाठी यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5G SA / NSA, Dual 4G VoLTE, Wi-Fi 802.11 ac, Bluetooth 5, GPS + GLONASS, USB Type-C, आणि NFC मिळू शकते.  

हे देखील वाचा:

31,000 रुपयांमध्ये iPhone 11; आतापर्यंतच्या बेस्ट किंमतीत Amazon सह Flipkart वरही उपलब्ध

यंदा राहू नका सिंगल! या डेटिंग अ‍ॅप्सच्या मदतीनं मिळवा Valentine’s Day 2022 च्या आधी डेट

Web Title: Samsung Galaxy A53 5G Phone Design And Specifications Leaked Ahead Of Launch 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.