धुमाकूळ घालण्यासाठी Samsung चा नवा 5G Phone; लाँच होण्याआधीच वेबसाईटवर लिस्ट
By सिद्धेश जाधव | Published: February 2, 2022 03:26 PM2022-02-02T15:26:29+5:302022-02-02T15:26:49+5:30
Samsung 5G Phone: Samsung Galaxy A53 5G लवकरच 8GB RAM, 64MP कॅमेरा, 4,800mAh बॅटरी आणि कंपनीच्या चिपसेटसह बाजारात येऊ शकतो.
Samsung स्वस्त 5G Phones वर काम करत असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. त्यानुसार आता आगामी सॅमसंग फोन्सची माहिती समोर येऊ लागली आहे. आता लाँच होण्याआधीच Galaxy A53 5G स्मार्टफोन NBTC च्या डेटाबेसवर दिसला आहे. याआधी हा हँडसेट गीकबेंच डेटाबेस आणि 3सी सर्टिफिकेशन वेबसाईटवर देखल दिसला होता.
नवीन लिस्टिंगमधून या डिवाइसच्या SM-A536E/DS या मॉडेल नंबरची माहिती मिळाली आहे. याआधी हा हँडसेट ब्लूटूथ एसआईजी आणि एचटीएमएल5टेस्ट डेटाबेसवर देखील दिसला होता. या सर्व लिस्टिंग्सवरून एकच गोष्ट सिद्ध होते ती म्हणजे लवकरच Samsung Galaxy A53 5G ग्राहकांच्या भेटीला येणार आहे.
Samsung Galaxy A53 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy A53 स्मार्टफोन 6.46 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाईल. हा पंच-होल डिजाइनसह येणारा पॅनल 1080 × 2400 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करेल. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित वनयुआय 4.0 वर चालेल. यात कंपनीचा एक्सनॉस 2100 चिपसेट देण्यात येईल. सोबत 8 जीबी रॅम आणि 256 जीबी पर्यंतची स्टोरेज मिळेल. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1 टीबी पर्यंत वाढवता येईल.
फोटोग्राफीसाठी यात क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळेल. तर या आगामी सॅमसंग फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 4,860एमएएचची बॅटरी देण्यात येईल जी 25वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. हा फोन White आणि Blue कलरमध्ये लाँच केला जाऊ शकतो.
हे देखील वाचा:
- 55 इंचाच्या 4K Smart TV वर मिळतोय जबराट डिस्काउंट; कमी किंमतीत मिळवा प्रीमियम अनुभव
- 6000mAh पर्यंतची बॅटरी असलेले हे Redmi फोन्स देतील दिवसभराचा बॅकअप; किंमत 12,500 पासून सुरु